वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग, आणि एकात्मिक फलोत्पादन विकास
अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने "हळद काढणी पश्चात व्यवस्थापन" या
विषयावर परीसंवाद दिनांक २६ मार्च रोजी पिंपळगाव (कुटे) ता. वसमत येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी वसमत (जिल्हा हिंगोली) येथील कृषि अधिकारी श्री. गजानन वरुडकर हे होते. कार्यक्रमामध्ये अन्नतंत्र
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर यांनी प्रमुख मार्गदर्शक करताना
शेतकऱ्यांना हळद काढणी पश्चात प्रक्रिया व उद्योगविषयक माहिती दिली आणि
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजक आणि
प्रमुख अन्वेषक डॉ. व्ही. एस. खंदारे (विभाग प्रमुख, उद्यानविद्या विभाग) यांनी
हळद पिकातील उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना आणि तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन
केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डॉ. ब. म. कलालबंडी यांनी केले. या प्रसंगी गावचे सरपंच श्री. राजकुमार कुटे, पोलीस
पाटील श्री. अनंत कुटे, तसेच उपसरपंच श्री. चांदोबा कदम
यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ. प्रवीण घाडगे, डॉ.
सदावर्ते, डॉ. ठाकूर मॅडम तसेच उद्यानविद्या महाविद्यालयाचे
डॉ. सचिन पव्हणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आणि डॉ. सातपुते मॅडम
यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शेतकऱ्यांनी या
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे
शेतकऱ्यांना हळद प्रक्रियेसंदर्भात नव्या संधी उपलब्ध होणार असून, भविष्यातही
असेच कृषिविषयक कार्यक्रम गावात आयोजित करण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.