प्रशिक्षणामुळे ट्रॅक्टर चालवण्यासह अचानक झालेल्या बिघाडांचे निवारण करण्याचे कौशल्यही विकसित होईल.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ,
परभणी व न्यू हॉलंड प्रायव्हेट लिमिटेड, नवी
दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात
दिनांक १० ते १२ मार्च दरम्यान ट्रॅक्टर चालकांसाठी तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण
शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरून
विविध केंद्रांमधून ५० ट्रॅक्टर चालकांची निवड करण्यात आली होती.
प्रशिक्षणाचा समारोप
दिनांक १२ मार्च रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आपल्या भाषणात त्यांनी ट्रॅक्टर चालकांना "साथी
आणि सारथी" असे संबोधून त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी
प्रशिक्षणामुळे ट्रॅक्टर चालकांना केवळ ट्रॅक्टर चालवण्याचे ज्ञान मिळणार नाही, तर अचानक
झालेल्या बिघाडांचे निवारण करण्याचे कौशल्यही विकसित होईल, असे
सांगितले.
कार्यक्रमाला
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश
अहिरे, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके, डॉ. स्मिता
सोळंकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माननीय कुलगुरू यांनी
ट्रॅक्टर चालकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. तसेच महाराष्ट्र
यांत्रिकीकरण केंद्र,
परभणी येथे कार्यरत टॅफे कंपनीचे कर्मचारी श्री. संजय मोरे, श्री. गजानन खेस्ते व श्री. शिवानंद शिवपुजे यांचा उत्कृष्ट प्रशिक्षण
दिल्याबद्दल माननीय कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षणात ट्रॅक्टरची
निगा, देखभाल, लहान-मोठे दुरुस्तीचे तंत्र, ट्रॅक्टर चालवताना घ्यावयाची काळजी आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या
उपायांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय रुंद वरंबा-सरी टोकन यंत्र,
ट्रॅक्टरचलित नांगर आणि कृषी क्षेत्रात ड्रोनचा उपयोग याविषयीही
तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची प्रस्तावना
प्रकल्प प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके यांनी केली. तज्ज्ञ मार्गदर्शक
म्हणून कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या माजी प्रमुख डॉ. स्मिता सोळंकी, टॅफेचे
वरिष्ठ अभियंता श्री. गजानन खेस्ते आणि प्रा. दत्तात्रय पाटील यांचे मोलाचे योगदान
लाभले. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी
विद्यापीठ कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर कार्यरत असल्याचे
सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्मिता
सोळंकी, डॉ. विलास खर्गखराटे, प्रा. दत्तात्रय पाटील,
डॉ. शैलजा देशविना, डॉ. ओंकार गुप्ता, इंजि. विशाल काळबांडे, डॉ. अविनाश राठोड यांनी विशेष
परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलजा देशविना यांनी केले, तर आभार प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले.
