उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षीय
भाषणात डॉ. व्हि. एस. खंदारे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगत, विद्यार्थ्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, असे
मत व्यक्त केले. विद्यापीठाचे कार्य "शेतकरी देवो भव:" या
ब्रीदवाक्यानुसार चालते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिबिराची सुरुवात प्रभात
फेरीने झाली,
ज्यामध्ये उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती
आणि आधुनिक शेतीविषयी जनजागृती केली. प्रास्ताविक श्री. प्रवीण घाडगे यांनी केले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ.
आर. बी. क्षीरसागर यांनी "समृद्ध शेतकरी एक चांगला उद्योजक कसा होऊ
शकतो" यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. आशा सातपुते यांनी सोयाबीन
वाणाच्या निवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. जैविक खते आणि बायोमिक्सचा फळपिके व
भाजीपाल्यावर होणारा परिणाम यावर डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त
माहिती दिली.
गावचे सरपंच श्री.
राजकुमार कुटे यांनी जीएम तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे
मांडले. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
शेतकऱ्यांनी अशाच शेतीसंबंधी उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी
अपेक्षा व्यक्त केली. या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे
शिक्षकवृंद, उद्यानविद्या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.
एस. बी. पव्हणे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ.
आशा सातपुते आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.
स्वाती पुंड आणि कु. जया सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन
श्री. कृष्णा भोईटे यांनी केले.