वातावरणातील प्रदूषण नियंत्रणासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक--डॉ. सुदाम शिराळे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती योजनेच्या पीक विविधता पथदर्शक
प्रकल्पांतर्गत दिनांक २५ मार्च ते २८ मार्च दरम्यान मराठवाड्यातील बीड, धाराशिव,
लातूर व छत्रपती संभाजी नगर येथे एकात्मिक शेती पद्धतीवर चार
दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे आयोजन माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि संचालक संशोधन डॉ. खिजर बेग,शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर तसेच एकात्मिक
शेती पद्धतीचे कृषि विद्यावेता डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात
आले.
या प्रशिक्षण शिबिराचे
आयोजन एकात्मिक शेती पद्धतीचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे, कृषि
विद्यावेता प्रा. शरद चन्नलवाड व श्री. पांडुरंग दुतकर यांनी केले. दिनांक २५
मार्च रोजी मौजे नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड येथे पहिल्या दिवशीच्या प्रशिक्षणासाठी तालुका कृषि अधिकारी श्री.
संगेकर, कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. हनुमान गरुड, डॉ. गायकवाड तसेच २५-३० कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि १०० ते १५०
शेतकरी उपस्थित होते. डॉ. सुदाम शिराळे यांनी एकात्मिक शेती पद्धती, जमिनीचे आरोग्य, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी उपाययोजना,
कार्बन क्रेडिट आणि पीक विविधता याविषयी मार्गदर्शन केले.
दिनांक २६ मार्च रोजी
मौजे अटकळी,
लातूर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बायोटेक्नॉलॉजी
कॉलेजचे डॉ. दुधारे, डॉ. भगत, डॉ.
सुदाम शिराळे, प्रा. शरद चन्नलवाड यांनी शेतकरी व कृषि
विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला बचत गटांच्या महिलांचाही
मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. तालुका कृषि अधिकारी श्री. राऊत यांनी सहकार्य केले.
दिनांक २७ मार्च रोजी
मौजे मंगरूळ,
ता. तुळजापूर येथे झालेल्या प्रशिक्षण शिबिरात कृषि विज्ञान
केंद्राचे विषयतज्ञ डॉ. अरबाड, तालुका कृषि अधिकारी देवकते
तसेच कृषि विभागातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
दिनांक २८ मार्च रोजी
मौजे कचनेर,
ता. छत्रपती संभाजी नगर येथे उपविभागीय कृषि अधिकारी श्रीमती पठारे,
तालुका कृषि अधिकारी श्री. गुळवे तसेच कृषि विभागाचे अधिकारी व
शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. डॉ. सुदाम शिराळे यांनी शेतकऱ्यांना
एकात्मिक शेती पद्धती, पीक विविधता प्रकल्प, जमिनीचे आरोग्य आणि शासनाच्या विविध योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
हे चार दिवसीय प्रशिक्षण
यशस्वी करण्यासाठी संशोधन केंद्राचे डॉ. आनंद गोरे, डॉ. सुदाम शिराळे, प्रा. शरद चन्नलवाड, श्री. पांडुरंग दुतकर आणि श्री.
मिर्झा बेग यांनी परिश्रम घेतले.