वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मौजे टाकळगव्हाण (ता. जि. परभणी)
येथे विशेष शिबिर संपन्न होत आहे. या शिबिराच्या अनुषंगाने २२ मार्च रोजी ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी
जलसंधारण जनजागृतीसाठी शेत-शिवार फेरीचे आयोजन केले. टाकळगव्हाण स्थानिक शेतीनिष्ठ
शेतकरी श्री. पांडुरंग वाघ यांच्या शेतात जल दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम
पार पडला. या वेळी कु. शिवानी गौळकर हिने पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषा परिधान
करून डोक्यावर पाण्याचा कलश घेतला आणि मिरवणूक काढण्यात आली, ज्यातून पारंपरिक पद्धतीने पाण्याचे
महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.
सुभाष विखे यांनी पाणलोट क्षेत्रातील विविध उपचार पध्दती जसे शेतीतील बांधबंदस्ती
व नाल्यावरील उपचार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय कृषि अनुसंधान
परिषदेमार्फत प्रवेशीत विद्यार्थी कु. अंशिका राऊत, कु. कोमल
राज, कु.अरपिता कच्छवे, श्री. उज्वल
कुमार, अभय साठे, केतन शिंदे, कु. शुभांगी गमे, कु. मधु डोंबांले, यांनी भाषणे केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाष
विखे, श्री. राजाराम वाघ, श्री. नागोराव वाघ, कु. सुप्रिया कोठेवाड, वैष्णवी सवंडकर, पलक इंदूरकर, श्रध्दा
मोहीते, श्री. आकाश थळकरी, श्री. अक्षय
भूतकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार आणि
जलजागृतीचे हे प्रयत्न भविष्यात जलसाक्षरता निर्माण करून शेतीच्या शाश्वत विकासास
चालना देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.