राज्यातील चार कृषि
विद्यापीठांच्या कृषि अर्थशास्त्र विभागाच्या २५ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महात्मा
फुले कृषि विद्यापीठ,
राहुरी येथे दिनांक २७ ते २८ फेब्रुवारी करण्यात आले. या परिषदेत दिनांक
२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र सोसायटी ऑफ अँग्रीकल्चरल इकॉनॉमिक्सच्या (MSAE)
सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. डी. एल. साळे (माजी
संचालक शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला) यांची, तर सचिवपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणी येथील कृषि अर्थशास्त्र विभागातील सहयोगी
प्राध्यापक डॉ. रणजित चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी
सहायक प्राध्यापक डॉ. धीरज पाथ्रीकर यांची निवड करण्यात आली.
या प्रतिष्ठित निवडीबद्दल
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संचालक
शिक्षण डॉ. भगवान आसेवार,
संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल तसेच सोसायटीचे उपाध्यक्ष तथा विभाग
प्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी अभिनंदन केले. या निवडीमुळे विद्यापीठ परिवारात
आनंदाचे वातावरण आहे.
या परिषदेत कृषि
अर्थशास्त्राशी संबंधित विविध संशोधन व नवीन धोरणांवर विचारविनिमय करण्यात आला.
राज्यातील कृषि अर्थशास्त्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या परिषदेचे
आयोजन यशस्वीपणे पार पडले.