Sunday, March 23, 2025

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा उत्साहपूर्ण प्रारंभ!

 कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचेडॉ. राजेश कदम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष शिबिर २०२४ -२५ चे उद्घाटन मौजे टाकळगव्हाण, ता. जि. परभणी येथे दि. २१ मार्च  रोजी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉ. राहुल रामटेके होते. यावेळी बोलताना डॉ. राहुल रामटेके यांनी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा, ठिबक सिंचन आणि संरक्षित शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या तांत्रिक बाबींचे महत्त्व स्पष्ट केले.

या प्रसंगी डॉ. राजेश कदम यांनी कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेऊन, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विवेकानंद भोसले, सरपंच श्री. मंचकराव वाघ, चेअरमन श्री. श्रीरंग वाघ आणि जिल्हा परिषद शाळा टाकळगव्हाणच्या मुख्याध्यापिका सौ. उषा उमरीकर यांची उपस्थिती होती. ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी शिबिरात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी शिरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दर्शन जाधव यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजाभाऊ वाघ, सौ. सुधा सालगुडे, विद्यार्थी पथक प्रमुख श्री. अभय देशमुख, समर्थ असुटकर, गणेश वळमपळे, श्री. आयुष उइके, कु. गंगा मठपती, कु. गायत्री पवार, श्री. वैभव वाघ, श्री. वरद बिनोरकर आणि इतर २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.