शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या
सक्षम करण्यासाठी उपक्रम लाभदायक.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यानुसार दिनांक १२ मार्च (बुधवार) रोजी एकूण ११ चमूमधिल ३४ शास्त्रज्ञांनी
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ४२५ शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या शेतीविषयक
समस्या जाणून घेवून त्यास समाधानकारक उत्तरे देवून विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या निमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा
उपक्रम लाभदायक ठरेल असे नमूद केले. तसेच यातून कृषी संशोधनाच्या नव्या संधी, आधुनिक
शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेली आधुनिक
पद्धती आणि कीड व रोग व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शेतकऱ्यासोबत
सखोल चर्चा करण्यात यावी, असे प्रतिपादन केले.
या उपक्रमात विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे मानवत (जिल्हा परभणी)
येथे प्रगतिशील शेतकरी श्री. मोहन लाड यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट व
चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या भेटीला नामवंत कृषी तज्ज्ञ, शासकीय
अधिकारी तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम (विस्तार शिक्षण), डॉ.
पुरूषोत्तम नेहरकर (कीटकशास्त्र विभाग), डॉ. रावसाहेब
भाग्यवंत (कृषी अभियांत्रिकी विभाग), मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी
डॉ प्रशांत देशमुख, कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री. चव्हाण, कृषी अधिकारी
श्री. ठाकूर, श्री. औंधकर, शेतकरी
श्री. मोहन लाड, श्री. बालाजी गोलाईत, श्री.
प्रताप सोरेकर यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. याठिकाणी रेशीम
संगोपन, संत्रा फळबाग व्यवस्थापन, दुग्ध
व्यवसाय यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञांनी
आधुनिक तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. त्यानंतर
श्री. बालाजी गोलाईत यांच्या कैलास पोल्ट्री फार्मला भेट देण्यात आली. पोल्ट्री
व्यवस्थापन, खाद्य नियोजन आणि व्यवसायिक संधी याविषयी सखोल
माहिती घेण्यात आली.
याबरोबरच "माझा
एक दिवस बळीराजा सोबत" उपक्रमांतर्गत मिरखेल (ता. परभणी) येथे प्रगतिशील
शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद व मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या
कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी
डॉ. एल. एन. जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मिरखेल व परिसरातील अनेक
शेतकरी या चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच विद्यापीठाचे परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय,
किटकशास्त्र विभाग, कृषि विस्तार शिक्षण विभाग, कृषि अभियांत्रिकी विभाग, छत्रपती संभाजीनगर
येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, तुळजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि खामगाव (ता.
गेवराई) येथील कृषि विज्ञान केंद्रे, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र आणि केळी संशोधन
केंद्र, परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती
केंद्र, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, परभणी, अंबाजोगाई,
लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे, येथील या
कार्यालयातील शास्त्रज्ञानी त्यांच्या परिक्षेत्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विभागाचे डॉ तुकाराम मोटे,
माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ मोहन पाटील, सहयोगी संचालकडॉ सूर्यकांत पवार, प्रभारी अधिकारी
डॉ. शिवाजी शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. वीणा भालेराव, सहयोगी कृषी विद्यावेत्ता
डॉ. अरविंद पांडागळे,
प्रभारी अधिकारी डॉ अनिल गोरे, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत
प्र. सूर्यवंशी, प्रा. अरुण गुट्टे, डॉ.जी.डी.गडदे, शास्त्रज्ञ
डॉ. बी.एम.कलालबंडी, डॉ.सी.व्ही.अंबाडकर, डॉ.डी.डी. पटाईत, डॉ. वर्षा मारवळीकर, डॉ. टी बी. सुरपम, डॉ. बी. बी.
गायकवाड, डॉ. अनिता जिंतूरकर, श्री अशोक निर्वळ, श्री नागेश सावंत यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमातून मिळालेल्या
मार्गदर्शनाचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल, हा उपक्रम शेतकरी हितासाठी प्रभावी
ठरत असल्याचे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.