माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे
महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्थेच्या (MSAE) २५व्या
रौप्य महोत्सवी परिषदेत सादर करण्यात आलेल्या संशोधन लेखाला द्वितीय पारितोषिक
(रौप्य पदक) आणि प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल
यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
"महाराष्ट्रातील शेतीच्या
हवामान बदलासंदर्भातील असुरक्षिततेचे स्थानिक विश्लेषण" (Spatial
Analysis of Agricultural Vulnerability to Climate Change in Maharashtra) या शोधनिबंधाचे लेखन श्रीमती कवी भारती (PhD विद्यार्थीनी),
प्रमुख मार्गदर्शक श्री. सचिन एस. मोरे आणि सदस्य श्री. आर. व्ही.
चव्हाण यांनी केले आहे.
ही प्रतिष्ठेची परिषद महात्मा फुले कृषी
विद्यापीठ, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे दिनांक २७-२८ फेब्रुवारी
दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या संशोधनास कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या
परिणामांवर महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल गौरविण्यात आले.
यामुळे विद्यापीठामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण
झाले आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी संपूर्ण
संशोधन चमूचे मनःपूर्वक अभिनंदन केले.