'सकाळ' नांदेड आवृत्तीच्या नवव्या वर्धापन दिन
सोहळ्याचे आयोजन सोमवारी (३ मार्च २०२५) करण्यात आले. या निमित्ताने वाचक,
लेखक, हितचिंतक, जाहिरातदार
आणि वितरकांसाठी स्नेहमेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या
कार्याक्रमास माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांनी 'सकाळ' मराठवाडा आवृत्तीचे संपादक श्री संतोष शाळीग्राम यांची भेट घेऊन शुभेच्छा
दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत सकाळ मराठवाडा युनिट चे सरव्यवस्थापक श्री. संजय चिकटे, ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी श्री माणिकराव रासवे, दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी श्री गणेश पांडे, प्रगतशील शेतकरी श्री जनार्दन आवरगंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी प्रसिद्ध शास्त्रीय भजन गायक पंडित यादवराज फड यांच्या 'संतवाणी' या भजन संगीतातून श्रोत्यांना अध्यात्मिक आणि सांस्कृतिक आनंद मिळला. त्यांच्या सुरेल गायनाने उपस्थित भक्तिरसात न्हाऊन निघाले. हा कार्यक्रम परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संपन्न झाला.