प्राध्यापकांनी शेवटपर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून द्यावा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी
विभागाच्या प्रमुख तसेच महाराष्ट्रातील प्रथम महिला कृषि अभियंता डॉ. स्मिता खोडके
या नियत वयोमानानुसार ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या
कार्यपूर्ती सोहळा आणि निरोप समारंभाचे आयोजन दिनांक २८ मार्च रोजी कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात
करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. तर
विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. विलास पाटील, डॉ. उदय खोडके तसेच माननीय श्रीमती जयश्री मिश्रा मॅडम, डॉ. स्मिता खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, अन्न व तंत्रज्ञान
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.बी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती
होती.
याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी परिवाराच्या वतीने माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते तसेच विद्यापीठातील विविध विभागांच्या
वतीने डॉ. स्मिता खोडके मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ
आणि भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
म्हणाले की, डॉ. स्मिता खोडके यांनी केलेल्या शिक्षण व संशोधन कार्याबद्दल व
विद्यापीठास दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून शैक्षणिक क्षेत्रात कार्य
करणारे प्राध्यापक कधीही निवृत्त होत नसतात. तसेच प्राध्यापकांनी संपूर्ण आणि आदर्श व्यक्तिमत्व
बनून शेवटपर्यंत आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा समाज आणि विद्यार्थ्यांना करून द्यावा असे
आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी डॉ. उदय खोडके, डॉ. विलास पाटील, डॉ. राहुल रामटेके, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, प्रा. मधुकर मोरे, प्रा.
हरीष आवारी, प्रा. सुमंत जाधव, प्रा.
सुभाष विखे, प्रा. संदीप पायाळ, डॉ. दयानंद
टेकाळे, डॉ. रघुनाथ जायभाये यांनी आपल्या भावना व्यक्त करून
डॉ. स्मिता खोडके यांच्या स्वभावाचे विविध पैलू;
नीटनीटकेपणा, विद्यार्थी प्रिय, कष्ट घेण्याची सवय, धाडसी स्वभाव, मनमिळाऊपणा, अगत्यशीलता, वात्सल्यसिंधू,
मृदुभाषी या बाबींचा आवर्जून उल्लेख केला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. स्मिता खोडके यांनी त्यांच्या
विद्यापीठातील सदतीस वर्षांच्या सेवेचा आढावा घेऊन विविध स्तरावर काम करून
विद्यार्थी घडविण्याची आणि शेतकरी व लघु उद्योजक यांची सेवा करण्याची संधी
मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी विद्यापीठ व विद्यापीठ प्रशासनाचे
ऋणही व्यक्त केले.
यावेळी अर्थशास्त्र
विभागाचे प्रमुख डॉ. सचिन मोरे, प्रा. रणजित चव्हाण, मृद व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण वैद्य, प्रा. हरिहर कौसडीकर, डॉ. आशा पाटील, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. विजया पवार, डॉ. गोदावरी पवार, डॉ.पपिता गौरखेडे, डॉ.प मिनाक्षी पाटील, गायत्री खोडके, कृषि
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. हरीष आवारी, प्रा. विवेकानंद भोसले यांची प्रमुख
उपस्थिती होती.