Monday, August 11, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते संकरित ग्लॅडिओलस लागवडीचा शुभारंभ

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबागेतील उच्च तंत्रज्ञान पुष्प उत्पादन प्रकल्पात दिनांक ११ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते नियंत्रित पद्धतीने संकरित ग्लॅडिओलस फुलपिकाच्या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संभाजीनगरस्थित कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत माननीय कुलगुरूंनी प्रक्षेत्र सौंदर्यीकरण, कृषी विद्यालय व महाविद्यालयांमधील प्रवेशवाढीसाठी उपाययोजना, वृक्षारोपण उपक्रम तसेच शेतकरी पुरस्कार यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश आहिरे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉ. सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर, कृषी विद्यालयाचे प्राचार्य भाऊराव मुळे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नैनवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. विजय सावंत, डॉ. सदाशिव अडकिने, गिरीश सोनवणे, प्रशांत सुरडकर व अनिल बखले यांनी विशेष प्रयत्न केले.