वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि केंद्रीय रेशीम बोर्डाचा संयुक्त उपक्रम
उद्योगाचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य प्राप्त होणे गरजेचे.... माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना आणि केंद्रीय रेशीम बोर्ड, अनुसंधान विस्तार केंद्र यांच्या संयुक्त
विद्यमाने दिनांक ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय तुती रेशीम उद्योग - कृषक
कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या सभागृहात
करण्यात आले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.
प्रमुख उपस्थितीमध्ये संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ.
राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
केंद्रीय रेशीम बोर्डाचे श्री. अशोक जाधव, किटकशास्त्र
विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. स्मिता सोळंकी,
शुभांगी गोरे, रेशीम उद्योजक श्री. बालाजी
पवार, श्री. अतुल लुगडे व श्री. संजय नाईकवाडे आदींचा समावेश
होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तीन दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करताना
नमूद केले की, शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक जोडधंदे
अत्यंत आवश्यक आहेत, आणि त्यामध्ये रेशीम उद्योग हा
एक महत्त्वाचा घटक आहे. या उद्योगाचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य प्राप्त होणे गरजेचे आहे.
यासोबतच, भविष्यात सीएसआरटीआय, म्हैसूरच्या धर्तीवर वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात
एक महिन्याचे रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी
मराठवाड्यात १०,००० शेतकऱ्यांना रेशीम प्रशिक्षण
दिल्याचा उल्लेख करत, सन २००४ मध्ये तुळजापूर कृषि विज्ञान
केंद्रात एक महिन्याचे प्रशिक्षण राबवले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अशोक जाधव यांनी करताना रेशीम उद्योगाची आर्थिकदृष्ट्या फायदेशीर संधी म्हणून ओळख करून दिली. श्री. बालाजी पवार यांनी मनरेगाच्या अनुषंगाने अनुदान सुधारण्याचा सल्ला देत, एकरकमी रुपये ४ लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दिल्यास रेशीम संगोपनगृह उभारणीस मदत होईल, असे सांगितले. त्यांनी शेडनेटऐवजी पक्क्या संगोपनगृहाच्या गरजेवर भर दिला. श्री. रामराव चौधर (ता. सोनपेठ, पारधवाडी) यांनी सेंद्रिय पद्धतीने तुती लागवड आणि कोंबडीपालनाची यशोगाथा सांगितली. तर खामकरवाडी (ता. वाशी) येथील श्री. अतुल लुगडे यांनी वर्षभरात ३ कोटी रुपयांची कोष उत्पादन उलाढाल झाल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. प्रशिक्षणासाठी परभणी, धाराशिव, नांदेड व अहिल्यानगर येथील सुमारे ४५ शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.