माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी संपूर्ण टीमचे केले अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड आणि सन सीड
प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील मानवत येथे
‘ॲग्री-फोटोव्होल्टेईक’ संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे नियमित भेटी देवून मार्गदर्शन करतात तसेच
प्रगतीचा आढावा घेतात. त्यामुळे प्रकल्पाचे कार्य अत्यंत वेगाने पुढे चालू असून
याचा लाभ पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधकांना मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सौर
ऊर्जा निर्मिती आणि पिक उत्पादन असे दुहेरी उद्दिष्ट साध्य केले जात आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण प्रकल्प प्रमुख डॉ. गोदावरी पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली वनस्पती शरीरक्रियाशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थीनी
प्रतिक्षा भजनावळे व सुमा बनकर यांनी तमिळनाडू कृषि विद्यापीठ, कोयंबतूर येथे
दिनांक ६ ते ७ ऑगस्ट दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले. या सादरीकरणास
‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’हा पुरस्कार टिसाईड युनिव्हर्सिटी, युके,
चे अधिष्ठाता, डॉ मायकेल शॉर्ट यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यार्थ्यांनीसह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व अशा प्रकारच्या सादरीकरणांमुळे
विद्यापीठाची संशोधन क्षेत्रातील ओळख अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
हा सन्मान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे,
नियंत्रक श्री प्रविण निर्मळ तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी
यांच्या सहकार्यामुळे प्राप्त झाल्याची भावना डॉ. पवार यांनी व्यक्त केली.