वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर २०२५-२६ या वर्षात यशस्वीरीत्या राबविण्यात आलेल्या ५०० एकर क्षेत्रावरील सघन कापूस लागवडीची पाहणी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १२ ऑगस्ट रोजी केली.
या प्रसंगी अमरावती येथील नियोजन विभागाच्या उपआयुक्त श्रीमती कावेरी नखले, अधीक्षक कृषि
अधिकारी श्री. निलेश ठोंबरे, महाराष्ट्र राज्य सल्लागार
श्री. ऋषभ माहेश्वरी, विभागप्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ.
हिराकांत काळपांडे, डॉ. हरिहर कौसडिकर, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे आणि डॉ. बस्वराज भेदे उपस्थित होते.
भेटीदरम्यान कापसाच्या बियाणे उत्पादनात वाढ करण्यासाठी ‘बी ते बी’
यांत्रिकीकरणासह कमी खर्चात अंमलात आणलेल्या संपूर्ण तंत्रज्ञानाबाबत सविस्तर
चर्चा झाली. अवलंबलेली ही तंत्रज्ञान पद्धत भविष्यात मराठवाड्यातील कापूस उत्पादक
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त
केला.
माननीय कुलगुरूंनी सघन कापूस लागवड पद्धतीतील बीटी कापसाच्या नाविन्यपूर्ण
व्यवस्थापनाबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. तसेच, कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत
उत्तम वाढ दर्शविणाऱ्या सोयाबीनच्या एमएयूएस-६१२ या जातीच्या पैदासकार बियाणे
उत्पादन प्रक्षेत्राचीही त्यांनी पाहणी केली.