वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी आणि उती
संवर्धन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम
(RAWE) तसेच कृषि-औद्योगिक सलग्नता उपक्रम (AIA) अंतर्गत “हळद व कपूस पिकांवरील कीड नियंत्रण” या
विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २५ ऑगस्ट रोजी मौजे इटलापूर (दे.),
ता. व जि. परभणी येथे करण्यात आले.
मेळाव्याचे अध्यक्षस्थान सौ. जयश्री मोतीराम खटिंग, सरपंच, इटलापूर यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ.
प्रविण वैद्य, तसेच कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम
नेहरकर उपस्थित होते. मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. विक्रम घोळवे आणि डॉ.
दिगंबर पटाईत यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी शास्वत शेती उत्पादनासाठी माती परीक्षणाचे
महत्व विशद केले.
या मेळाव्याचे यशस्वी आयोजन डॉ. एस. एन. पवार, डॉ. के. एम. शर्मा
आणि डॉ. अनिल धमक यांनी केले. तसेच इटलापूर-मांडवा येथील कृषि कन्या आणि कृषि दूत
यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी
माहितीपत्रके वाटली तसेच शेतात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक श्रेया कच्छवे यांनी केले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन साक्षी मुखरे यांनी तर आभार प्रदर्शन अप्पासाहेब मदन यांनी केले.
मेळाव्यात हळद आणि कपूस यांसारख्या प्रमुख पिकांवरील रोग व कीड व्यवस्थापन, शेतीमधील नवीन
तंत्रज्ञानाचा अवलंब, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी
लागणारे उपाय या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विविध शंका
मांडून समाधानकारक मार्गदर्शन घेतले.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ,
तसेच कीड व रोग व्यवस्थापन या सर्व बाबतीत उपयुक्त माहिती मिळाली
असून, कृषि उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी हा मेळावा अत्यंत
उपयुक्त ठरला.