नांदेड जिल्ह्यातील कृषि
विभागातील विविध उपक्रमांचा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे माननीय कृषि मंत्री
ना. श्री दत्तात्रयजी भरणे यांनी दिनांक २० ऑगस्ट रोजी भेट दिली. या वेळी वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नांदेडचे
जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले, लातूर
विभागाचे कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, नांदेड
जिल्ह्याचे अधीक्षक कृषि अधिकारी श्री कळसाईत, कृषि विकास
अधिकारी श्री ऐतवाडे तसेच उपविभागीय कृषि अधिकारी श्रीमती गुंजकर यांची उपस्थिती
होती.
या भेटीदरम्यान माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिलासा
देण्यासाठी व पिकांची हानी टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, रोग-कीड नियंत्रण तंत्रज्ञान, बाजारभावांची माहिती वेळेत उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यासाठी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती केंद्र म्हणून
कार्य करेल. याबरोबरच विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या
तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठ व कृषि
विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून प्रभावी पद्धतीने माहिती पोहोचवली जाईल.
यासाठी विविध माध्यमांचा वापर करून तंत्रज्ञान व मार्गदर्शन थेट शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवले जाईल. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना
माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याची संपूर्ण जबाबदारी
विद्यापीठाची असल्याची ग्वाही माननीय कुलगुरूंनी दिली.