Monday, August 11, 2025

वनामकृवि अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा नायगाव येथे उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ क्रीडा प्रकाराची स्पर्धा दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.) येथे आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या स्पर्धेचे यजमानपद एज्युकेशन सोसायटी, नायगाव (बा.) संचलित कृषी महाविद्यालय व अज्ञत्रंत महाविद्यालय, नायगाव (बा.) यांनी संयुक्तरीत्या निभावले.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. आर. सी. लव्हेकर, अज्ञत्रंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. आय. मोरे, कृषी महाविद्यालय, नायगावचे प्राचार्य डॉ. आर. जी. नादरे, विद्यापीठ स्तरीय निवड समितीचे प्रभारी डॉ. झटे, तसेच श्री. बिलपे, श्री. मणियार, डॉ. अंबिका मोरे, डॉ. शृंगारे, श्री. राऊत, डॉ. रमेश पाटील, डॉ. लोहकरे, विविध महाविद्यालयांचे संघ व्यवस्थापक, आयोजन समितीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

या स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त विविध महाविद्यालयांतील संघांनी सहभाग नोंदवून आपली बुद्धिमत्ता व खेळकौशल्य सादर केले.