Monday, August 11, 2025

जालना जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ११ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मौजे वारोदी येथे भेट देऊन प्रगतशील शेतकरी श्री जयकिशन रामदास शिंदे यांच्या सेंद्रिय तसेच एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाची माहिती घेतली.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना त्यांच्या उपक्रम अधिक यशस्वी व शाश्वत करण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबी, सुधारित पद्धती आणि बाजारपेठ संधींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय शेती ही पर्यावरणपूरक, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादन देणारी पद्धत असल्याचे विशेष अधोरेखित केले.

या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, आत्मा प्रकल्प संचालक श्री. अमोल आगवान, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर (छत्रपती संभाजीनगर) व डॉ. सचिन सोमवंशी (बदनापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.