सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर
सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सोयाबीन
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ सुनिल उमाटे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ राजेंद्र जाधव
यांनी उपाययोजना सुचवून शेतकऱ्यांसाठी सल्ला दिला आहे.
सामान्य सल्ला:
सध्या राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे, तेव्हा सर्व शेतकयांना/बिजोत्पादकांना विनंती करण्यात येते की, पिकात
साचलेले अतिरिक्त पाणी काढून टाकावे जेणे करून सोयाबीन बीजोत्पादनाचे होणारे
नुकसान टाळता येईल.
पाऊस थांबल्यानंतर किड व रोगाचे प्रमाण वाढण्याची श्यक्यता
असल्याने सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या अळया पाने व फुले व शेंगा खातांना दिसतात.
अश्या परीस्थितीमध्ये शेतकयांना / सोयाबीन बिजोत्पादकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी शिफारस केलेल्या किटकनाशकाचीच फवारणी करावी.
ज्या भागात तिन्ही पानेखाणाऱ्या अळया (डिफोलिएटर) (हिरवी
उंटअळी,
तंबाखुवरील पानेखणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी
(घाटे अळी) चा प्रादुर्भाव आहे तेथे स्पिनेटोरम 11.70% एससी (450 मिली/हे.) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल
18.50% एससी (150 मिली/हे.) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.30% + लँबडा सायहॅलोथ्रीन
4.60% झेडसी (200 मिली/हे.) यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
केंद्र सरकारच्या केंद्रीय किटकनाशक मंडळाने सोयाबीनसाठी शिफारस
मंजुर अर्थात लेबल क्लेम नसलेली रसायने (किटकनाशक/तणनाशक/बुरशीनाशक) वापरु नयेत.
शेतकयांनी तसेच सोयाबीन बिजोत्पादकांनी
किटकनाशक फवारणी करतांना शिफारस केलेल्या प्रमाणात पाणी वापरावे. (नॅपसॅक
पंप/ट्रॅक्टरनेचालवलेल्या स्प्रेसाठी 450 लि./हे. किंवा पावर स्प्रेसाठी 120
लि./हे.).
एका वेळी एकाच रासायनिक कीटकनाशकाची फवारणीकरावी. एकापेक्षा अधिक
कीटकनाशके व बुरशीनाशके एकमेकांत मिसळुन फवारणी करू नये.
सध्या अति पावसामुळे शेतात मजुरा करवी फवारणी करणे श्यक्य नसल्यास
ड्रोन यंत्राचा फवारणीसाठी वापर करावा.
कीड नियंत्रण:
सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळीच्या (घाटेअळी)
नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड 20%
डब्ल्युजी (250-300 ग्रॅम/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड 39.35% एससी (150 लि./हे.)
किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.50% एससी (150 मिली/हे.) किंवा इमामेक्टिन बेंझोएट
1.90% ईसी (425 मिली/हे.) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
तंबाखुवरील पानेखाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिटुरा)
च्या नियंत्रणासाठी, शेतकयांनी/सोयाबीन
बिजोत्पादकांनी खालीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणीकरावी.
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.50% एससी (150 मिली/हे.) किंवा स्पिनेटोरम 11.70% एससी
(450 मिली/हे.) किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90% ईसी (425 मिली/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड
20% डब्ल्युजी (250-300 ग्रॅम/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड 39.35% एससी (150
लि./हे.) किंवा इंडोक्झाकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हे.) किंवा क्लोरफ्लुआजुरोन
5.40% ईसी (1500 मिली/हे.) किंवा नोव्हाल्युरॉन 5.25% + इंडोक्झाकार्ब 4.50% एससी
(825-875 मिली/हे.) किंवा ब्रोफ्लानिलीड 300 ग्रॅम/ली. एससी (42-62 ग्रॅम/हे.).
तंबाखुवरील पानेखाणारी अळी आणि घाटे अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी
शेतकयांना/सोयाबीन बिजोत्पादकांना फेरोमोन सापळे (हेक्टरी 5) बसविण्याचा आणि एनपीव्ही
(250/हे.) वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
उंटअळीच्या नियंत्रणासाठी, शेतकयांनी/सोयाबीन बिजोत्पादकांनी क्लोरँट्रानिलीप्रोल
18.50% एससी (150 मिली/हे.) किंवाइमामेक्टिन बेंझोएट 1.90% ईसी (425 मिली/हे.)
किंवा ब्रोफ्लानिलीड 300 ग्रॅम/ली. एससी (42-62 ग्रॅम/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड
20% डब्ल्युजी (250-300 ग्रॅम/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड 39.35% एससी (150
लि./हे.) यापैकी एका किटकनाशकाची किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन 4.90% सीएस (300
मिली/हे.) किंवा प्रोफेनोफॉस 50% ईसी (1 लि./हे.) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.30%
+ लँबडा सायहॅलोथ्रीन 4.60% झेडसी (200 मिली/हे.) चा वापर करावा.
बिहारी केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्यास, शेतकयांनी/सोयाबीन बिजोत्पादकांनी प्रभावीत झाड/झाडे
काढून टाकावीत तसेच प्रादुर्भाव जास्त झाल्यास फ्लुबेंडियामाईड 20% डब्ल्युजी
(250-300 ग्रॅम/हे.) किंवा फ्लुबेंडियामाईड 39.35% एससी (150 लि./हे.) किंवा लँबडा
सायहॅलोथ्रीन 4.90% सीएस (300 मिली/हे.) किंवा इंडोक्झाकार्ब 15.80% ईसी (333
मिली/हे.) ची फवारणी करावी.
खोडमाशीच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसु
लागताच खोडमाशीचे नियंत्रण करण्यासाठी थायमिथोक्झाम 12.60% + लँबडा सायहॅलोथ्रीन
9.50% झेडसी (125 मिली/हे.) किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81%
ओडी (350 मिली/हे.) किंवा आयसोसायक्लोसेरम 9.2 डब्ल्युडब्ल्युडीसी (10%
डब्ल्यु/व्ही) डीसी (600 मिली/हे.) बायफेंथ्रीन 32 % डब्ल्युजी + क्लोरँट्रानिलीप्रोल12%
डब्ल्युजी (250 ग्रॅम/हे.) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
चक्रीभुंग्याची लक्षणे दिसु लागताच शेतकयांनी/सोयाबीन शेतकऱ्यांनी प्रभावित झाड/भाग नष्ट करावा तसेच थायक्लोप्रीड
21.70% एससी (750 मिली/हे.) किंवा
टेट्रानिलीप्रोल 18.18% एससी (250-300 मिली/हे.)
किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.50% एससी (150 मिली/हे.) किंवा इमामेक्टिन बेंझोएट 1.90% ईसी (425
मिली/हे.) किंवा प्रोफेनोफॉस 50% ईसी (1
लि./हे.) ची फवारणीकरावी.
पाने खाणाऱ्या अळया, रसशोषण करणारी किडी
जसे पांढरी माशी/तुडतुडे तसेच खोडमाशी या किडींचा एकाच वेळी प्रादुर्भाव असतो, अशा ठिकाणी थायमिथोक्झाम 12.60% + लँबडा
सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी (125 मिली/हे.)
किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81%
ओडी (350 मिली/हे.) किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल
9.30% + लँबडा सायहॅलोथ्रीन 4.60% झेडसी
(200 मिली/हे.) किंवा इंडोक्झाकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हे.) यापैकी कोणत्याही एका पुर्व मिश्रीत
किटकनाशकाची फवारणी करावी.
रोग नियंत्रण:
रायझोक्टोनीया एरीयल ब्लाईटची लक्षणे
दिसु लागताच शेतकयांना/सोयाबीन बिजोत्पादकांना फ्लुक्झोपायरोक्झाड
167 ग्रॅम/लि. + पायराक्लोस्ट्रोबिन 333
ग्रॅम/लि. एससी (300 ग्रॅम/हे.) किंवा पायराक्लोस्ट्रोबिन
133 ग्रॅम/लि. + एपॉक्झीकोनाझोल 50
ग्रॅम/लि. एसई (750 मिली/हे.) किंवा
पायराक्लोस्ट्रोबिन 20 डब्ल्युजी (375-500 ग्रॅम/हे.) या शिफारसकेलेल्या बुरशीनाकांची फवारणी करण्याची शिफारस
करण्यात येते.
सतत पाऊस पडत राहिल्यास, अँथ्रॅक्नोज
रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. शेतकयांना/सोयाबीन बिजोत्पादकांना सल्ला देण्यात येतो की, त्यांनी नियमीत अंतराने त्यांच्या पिकाचे निरीक्षण करावे आणि लक्षणे दिसु
लागताच टेबुकोनॉझोल 25.9 ईसी (625 मिली/हे.) किंवा टेबुकोनॉझोल 38.39% एससी (625
मिली/हे.) किंवा टेबुकोनॉझोल 10% असल्फर 65%डब्ल्युजी (1.25 कि./हे.) किंवा कार्बेंडाझिम
12% + मेन्कोझेब 63%डब्ल्युपी (1.25 कि./हे.)ची फवारणी करावी.
पिवळा मोझॅक/सोयाबीन मोझॅक या रोगाच्या नियंत्रणासाठी, प्रभावित झाड/झाडे उपटुन टाकावी/नष्ट करावीत. तसेच नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 12.60% + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी (125 मिली/हे.) किंवा बेटासायफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (350 मिली/हे.) किंवा अॅसेटॅमीप्रीड 25% +अ बायफेंथ्रीन 25% डब्ल्युजी (250 ग्रॅम/हे.) या शिफारस केलेल्या पुर्वमिश्रीत किटकनाशका पैकी एका किटकनाशकाचा वापर करावा. यामुळे खोडमाशीचे नियंत्रण सुलभ होईल. सोयाबीनच्या “पिवळा मोझॅक” या रोगाचे वहन पांढरी माशीमुळे होते तेव्हा नियंत्रणकरण्यासाठी पिवळे चिकट सापळे एकरी 15-20 वापरावीत.