Sunday, August 17, 2025

लिहाखेडी पालोद येथील शासकीय कृषी महाविद्यालयाबाबत माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार व माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची चर्चा

 ए ग्रेड’ मानांकन मिळाल्याबद्दल माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार यांचा माननीय कुलगुरूंना गौरव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय, लिहाखेडी पालोद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयाच्या संदर्भात माजी कृषिमंत्री व माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत महाविद्यालयासाठी पदनिर्मिती, नवीन इमारतीचे बांधकाम तसेच इतर पूरक सुविधा याबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्याचप्रमाणे मका संशोधन केंद्र तातडीने सुरू करण्याविषयीही चर्चा झाली.

विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल माननीय आमदार श्री अब्दुल सत्तार यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा सत्कार केला.

या प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय दिलीप देशमुख, कृषी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी तथा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार आणि माजी तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील उपस्थित होते. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व कार्यकारी परिषद सदस्य श्री दिलीपराव देशमुख यांनी लिहाखेडी पालोद येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या जागेची पाहणीही केली.