Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Monday, March 6, 2023
मौजे येळंबघाट (ता जि बीड) येथे वनामकृवि विकसित ज्वारीचे ‘परभणी शक्ती’ वाणांची पाहणी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित देशातील
ज्वारीचे पहिले जैवसंपृक्त ‘परभणी शक्ती’ या वाणाची लागवड मौजे येळंबघाट (ता जि बीड) येथील शेतकरी श्री राम कदम यांनी केली असुन
सद्यस्थितीत सदर पिक चांगल्या परिस्थितीत आहे. या प्रक्षेत्रास विद्यापीठाचे विस्तार
शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी दिनांक १ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी
ज्वार पैदासकार डॉ एल एन जावळे, डॉ सुर्यवंशी, सरपंच श्री दिनेश कदम, उमेश चादर, संतोष कदम, सुधाकर कदम आदीसह गांवकरी उपस्थित होते. यावेळी
मार्गदर्शनात डॉ देवसरकर यांनी शेतकरी बांधवांनी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य वाणांची निवड करण्याचा सल्ला दिला तर डॉ एल एन जावळे यांनी परभणी शक्ती
वाणात इतर ज्वारीच्या वाणापेक्षा जास्त लोह व जस्त असुन मानवी स्वास्थकरिता उपयुक्त
असे सांगितले. डॉ सुर्यवंशी यांनी विविध पिक लागवडीबाबत माहिती दिली. श्री दिनेश कदम
यांनी आभार मानले.
वनामकृवि विकसित विघुतचलित कढई निर्मिती व विक्री परवाना सुशील सायंटिफिक वर्क्स व बाबाजी ट्रेडर्स कंपनीस
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने विविध धान्यापासुन लाहया व फुटाणे तयार करण्याकरिता संशोधनाच्या आधारे विद्युतचलित कढईची निर्मिती केली आहे. सदर कढईमध्ये ज्वारी, मका आणि बाजरीच्या लाहया तसेच शेंगदाणा, सोयाबीनचे खरमुरे, हरभ-याचे फूटाणे तयार करता येतात. या कढईची क्षमता दिवसाकाठी ५० किलो असुन यात धान्यानुसार तापमान नियंत्रित करता येत असल्यामुळे चांगल्या प्रतिचे उत्पादन घेता येते. सदर विद्युतचलित कढईला बचत गट, ग्रामीण महिला, लघु उद्योजकांकडुन मोठया प्रमाणात मागणी होत असल्यामुळे या कढईची निर्मिती आणि पुरवठा जलद व्हावा या उददेशाने सामंजस्य कराराच्या माध्यमातुन अंबाला कॅन्ट येथील सुशील मॉडेल अँड सायंटिफिक वर्कस यांना विद्युतचलित कढईच्या निर्मितीचा तर मे. बाबाजी ट्रेडर्स, परभणी यांना विक्रीचा परवाना देण्यात आला. सदर करारावर दिनांक २ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ.उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ.स्मिता खोडके यांनी स्वाक्ष-या केल्या.
यावेळी कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात विकसित केलेल्या विद्युतचलित कढईचा उपयोग महिला बचत गट, ग्रामीण महिला, शेतकरी उत्पादक कंपन्या व युवकांना लघुउद्योग सुरु करण्यास होणार आहे. विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, त्यांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याकरिता विद्यापीठ विविध संस्था, उद्योजक व कंपन्याशी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर करार करित आहे.
सदर कढईची निर्मिती कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या डॉ स्मिता खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर बैठकीस संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ.सईद इस्माईल, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षिरसागर, मे.बाबाजी ट्रेडर्स कंपनीचे श्री. शर्मा, डॉ.डिगांबर पेरके, डॉ.स्मिता सोळंकी, श्री.कोल्हे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ.शाम गरुड आदी उपस्थित होते.
भरड धान्य: अदृश्य ऊर्जा असलेले पौष्टिक अन्न ...... प्रा डॉ कैलास गाडे
वनामकृवित राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन
आंतरराष्ट्रीय
भरड धान्य वर्ष २०२३ निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक यांच्या करिता दिनांक ३ मार्च
रोजी कृषी वनस्पतीशास्त्र विभाग येथील सभागृहात "भरडधान्य अदृश्य ऊर्जा
पिके" या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात कृषी
अन्न तंत्र महाविद्यालयातील तज्ञ डॉ. कैलास गाडे यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात
डॉ. कैलास गाडे म्हणाले की, भरड धान्य ही फायटो केमिकल्स युक्त, ग्लुटेन मुक्त, आम्ल निर्माण न करणारी आणि अलर्जी विरहित असुन हे मानवा करिता अदृश्य
ऊर्जा असलेले अत्यंत पौष्टिक अन्न आहे. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील
शर्करा ट्राय ग्लिसराइड्स आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन च्या प्रमाणात घट होते, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळतात. ही धान्य तंतुमय असल्यामुळे
आहारातील तंतूमध्ये पाणी शोषून घेऊन फुगण्याची क्षमता असते, यामुळे
अन्न आतड्यात हळूहळू पुढे सरकते व पचनाचा कालावधी वाढविते. भरडधान्यात सात ते बारा
टक्के प्रथिने दोन ते पाच टक्के मेद ६५ ते ७५ टक्के कर्बोदके आणि पंधरा ते वीस
टक्के आहारातील फायबर असतात.
सदर
कार्यक्रम शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली
छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन ऋषभ रणवीर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव चाटेकर यांच्यासह छात्रसैनिकांनी
परिश्रम घेतले.
Sunday, March 5, 2023
वनामकृवित शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली वर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नाहेप प्रकल्पांतर्गत शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली यावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि अध्यक्षतेखाली संपन्न झाले, यावेळी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह, आयटी सल्लागार डॉ. आर.सी. गोयल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. इंद्रा मणी म्हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली मुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यास मोठा हातभार लाभणार आहे. यावेळी कुलगुरू मा डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
डॉ सुदिप मारवाह म्हणाले की, शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीमुळे सर्व शैक्षणिक कार्य वेळेत पुर्ण होऊन विद्यार्थ्यीचे विविध अभ्यासक्रमातील प्रवेशापासुन ते पदवी अभ्यासक्रम पुर्ण होई पर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे, यात अभ्यासक्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्याशाखा व्यवस्थापन, ई लर्निंग आणि ऑनलान शुल्क संकलन याचा समावेश असुन यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.
मार्गदर्शनात डॉ. आर. सी. गोयल म्हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली माध्यमातून संस्थेची प्रत्येक शैक्षणिक माहिती विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एका क्लिकवर कुठेही आणि केव्हाही उपलब्ध होणार आहे डॉ. धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाने शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली करिता विद्यापीठ करित असलेलया कार्याची माहिती दिली.
दोन दिवसातील तांत्रिक सत्रात डॉ. आर. सी. गोयल, श्रीमती रजनी गुलिया आणि श्रीमती निशा यांनी शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (एएमएस), ऑनलाईन शिक्षण प्रणाली, ई-लर्निंग आदीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रणजित चव्हाण यांनी केले तर मुख्य अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्पातील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ. रविंद्र शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. बी. एम. ठोंबरे, डॉ. जे. ई. जहागीरदार, डॉ. एस. डी. बांतेवाड, डॉ. आर. डी. अहिरे, डॉ. बी. व्ही. आसेवार, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. आर. बी. क्षीरसागर आदीसह प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
Saturday, March 4, 2023
हुंडाबळी, बालविवाह, स्त्रीभ्रुण हत्या या समाजातील विकृती विरोधात लढा दयावा लागेल......मा श्रीमती रूपालीताई चाकणकर
वनामकृवितील विद्यार्थी-विद्यार्थींनीशी साधला संवाद
देशाने व राज्याने मोठी प्रगती केले आहे, तरिही स्त्रीबाबत
समाजाचा दृष्टीकोन आजही बदलेला नाही. हुंडाबळी, बालविवाह, स्त्री भ्रुण हत्या या कमी होतांना दिसत नाही, समाजातील
या विकृती विरोधात आपणास लढा दयावा लागेल, असा सल्ला महाराष्ट्र
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा श्रीमती रूपालीताई चाकणकर यांनी दिला. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक ३ मार्च रोजी महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत
विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक
डॉ धर्मराज गोखले, महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती संगिताताई
चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, श्रीमती भावनाताई नखाते, श्री कैलास तिडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य प्रा हेमंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्रीमती रूपालीताई चाकणकर पुढे म्हणाल्या की, राज्यात सर्वात
जास्त बालविवाह परभणी जिल्हयात होतात, हे चित्र आपणास बदलावे
लागेल. शेतकरी आत्महत्या मागे हुंडा प्रथा, मुलींचे मोठे लग्न
लावणे हे सुध्दा कारण असुन सर्वांनी हुंडा घेणार नाही व हुंडा देणार नाही असे ठरविले
तर अनेक लेकीचे बाप वाचतील. आज रूढी परंपराच्या नावाखाली महिलांवर अत्याचार होत आहे, हे थांबविण्याकरिता एकत्रित आपण लढा देऊ, असे त्या
म्हणाल्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ धर्मराज गोखले यांनी श्रीमती रूपालीताई चाकणकर यांचे आभार मानुन विद्यापीठ विद्यार्थीनी व महिला सुरक्षाबाबत संवेदनशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जया बंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ निता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
Thursday, March 2, 2023
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त वनामकृवित भित्तीपत्रक सादरीकरणाद्वारे जागृती कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने भरड धान्य विषयी जनजागृती करण्यात येत असुन दिनांक २ मार्च रोजी कृषि वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता “अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी भरड धान्य” या विषयावर भित्तीपत्रके निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, सदर भित्तीपत्रक दालनाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट भित्तिपत्रक तयार करणा-या विद्यार्थ्यांना मा. कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्हणाले की, परभणी येथील ज्वार संशोधन केंद्र देशातील सर्वात जुन्या संशोधन केंद्रापैकी एक असुन परभणी कृषी विद्यापीठाने ज्वारी व बाजरी पिकांमध्ये अनेक चांगली वाण विकसित केली आहेत. यावर्षी ज्वारी मधील देशातील पहिले जैवसंपृक्त वाण परभणी शक्ती अनेक शेतकरी बांधवानी लागवड केली आहे, इतर वाणापेक्षा यात मोठया प्रमाणात लोह व जस्ताचे प्रमाण असुन मानवी आरोग्यास स्वास्थवर्धक आहे. विद्यापीठाने गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर सामजंस्य करार केले असुन याचा फायदा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दर्जेदार संशोधनाकरिता होणार आहे. नुकतेच नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन तेवीस विद्यार्थी थायलंड येथे डिजिटल शेती तंत्रज्ञान प्रशिक्षणास गेले असुन कृषि संशोधन क्षेत्रात कृषिच्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकांचे सादरीकरण केले तसेच विद्यार्थीनीनी भरड धान्याचा वापर करुन काढलेल्या रांगोळीची उपस्थितांनी प्रशंसा केली. माननीय कुलगुरू यांनी विभागातील पदव्युत्तर व आचार्य पदवी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रक्षेत्रास भेट दिली. भाभा अणुसंशोधन केंद्र व कृषि वनस्पतीशास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या येत असलेल्या उत्परिवर्तनाद्वारे पिवळी ज्वारीच्या व रब्बी ज्वारीच्या उच्च उत्पादन व गुणवत्ता मध्ये बदल घडविण्यासाठीच्या प्रयोगांस भेट दिली. माननीय कुलगुरु यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदीसह विभागातील प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मिना वानखडे व डॉ. अबिका मोरे यांनी केले तर आभार डॉ. अंबालिका चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. राजेश धुतमल, डॉ. दत्तात्रय दळवी, डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. दिलीप झाटे यांचे सहकार्य लाभले.


.jpeg)
.jpeg)


.jpeg)
.jpeg)



.jpeg)

.jpeg)












