वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पास परभणी मुख्यालयातील विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि सर्व संशोधन केंद्रांचे प्रमुख यांच्या प्रक्षेत्र भेट आणि चर्चासत्राचे आयोजन दिनांक ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक कार्यक्रमात शास्त्रीय सूचना आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करून संशोधन कार्यास चालना मिळावी आणि सुयोग्य व शेतकरी उपयोगी शाश्वत तंत्रज्ञान विकसित व्हावे या उद्देशाने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली या भेट व चर्चासत्राचे आयोजन एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. आनंद गोरे व त्यांचे सहकारी यांनी केले.
या उपक्रमात विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी आणि शास्त्रज्ञ
यांनी सहभाग घेतला व चर्चासत्रात अनेक सूचना व मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात
विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते, त्यामध्ये मृद विज्ञान
विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, कीटकशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, दुग्धशास्त्र व पशुसंवर्धन विभाग
प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख
डॉ. प्रफुल्ल घंटे, हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. जी.
जाधव, उती संवर्धन प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे,
रेशीम संशोधन विभाग प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, गहू-मका संशोधन विभाग प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, पेरसाळ संशोधन विभाग प्रभारी अधिकारी डॉ. कौशल्य, फळ
रोपवाटिका विभाग प्रभारी अधिकारी डॉ. संतोष बरकुले, हवामानशास्त्र
विभागाचे डॉ. कैलाश डाखोरे, पाणी व्यवस्थापन संशोधन विभाग
प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी, ज्वार संशोधन विभाग प्रभारी
अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, दीर्घकालीन खतप्रयोग योजनेचे
प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे, बीजोत्पादन विभाग
प्रभारी अधिकारी डॉ. राठोड, डॉ. संतोष शिंदे आणि कीटकशास्त्र
विभागाचे डॉ. अनंत लाड आदी शास्त्रज्ञ सहभागी होते.
या भेटी दरम्यान शास्त्रज्ञांनी संशोधन प्रक्षेत्र तसेच
एकात्मिक शेती पद्धती मॉडेल, दूध उत्पादन, शेळीपालन,
गांडूळखत, फुलशेती, भाजीपाला,
विविध पीक पद्धती, केळी लागवड, हळद लागवड, बीजोत्पादन इत्यादी क्षेत्रांची पाहणी
करून मार्गदर्शन केले. तसेच आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर, पाणी
वापर कार्यक्षमता,ज्वारी हुरडा पिकाचा पीक पद्धतीत समावेश,
मूरघास निर्मिती, रोग व्यवस्थापनासाठी
प्रतिबंधात्मक उपाय, नर बोकुड आदला-बदल अशा विविध सूचना
करण्यात आल्या.
संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आनंद
गोरे, डॉ. सुदाम शिराळे, प्रा. शरद चेनलवाड यांनी या
भेटीसाठी पुढाकार घेतला.
भेट यशस्वी करण्यासाठी विभागाचे श्री. दुतकर, श्री. मिर्झा बेग, श्री. महेश ढगे, श्री. प्रभू मोहिते, श्री. लोंढे, श्री. विठ्ठल जाधव यांनी परिश्रम घेतले.