शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे प्रथःकरण करावे !... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटक शास्त्र विभागाद्वारा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ
कृषि संवाद कार्यक्रमाचा चौतिसावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, शेती उद्योग किफायतशीर होण्याच्या
दृष्टीने शेतीमध्ये कमीत कमी निविष्ठाचा वापर होऊन अधिक उत्पादन मिळणे आवश्यक असल्याचे
नमूद केले. सध्या नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर
करावा आणि सेंद्रिय घटकास प्राधान्य द्यावे. यातूनही निष्ठावरील खर्च कमी होण्यास
मदत होते. शेती हा व्यवसाय असून जमाखर्चांचा ताळेबंद ठेवणे महत्त्वाचे आहे.
विद्यापीठाने शेतकऱ्यांची शेती फायद्याची करून त्यांना अधिक अधिक समृद्ध
करण्याच्या दृष्टीने विविध संशोधन आणि विस्तार कार्य अवलंबलेले आहे. यासाठी दर
मंगळवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादामध्ये शेतकऱ्यांनी
विचारलेल्या प्रश्नांचे प्रथःकरण करावे. यातून शेतकऱ्यांची मानसिकता ओळखून त्यांना
आवश्यक ते तंत्रज्ञान दिले जाईल असे नमूद केले. ऑनलाईन कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या
यशोगाथा त्यांच्या वाणीतून शेतकऱ्यांसमोर मांडल्या जात आहे. यातूनही शेतकऱ्यांना
आवश्यक असलेल्या माहिती त्यांच्याच जवळच्या व्यक्तीकडून त्यांना मिळत आहेत. यावेळी
माननीय कुलगुरूंनी त्यांच्या आजपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या
कार्याचा आणि जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. ते म्हणाले की मार्गदर्शनातून
उभारलेल्या शेतकऱ्यांना अधिकचे आणि दर्जेदार उत्पादन मिळाले यामुळे बाजारात त्या
मालाची मागणी वाढली आणि अल्पावधीत विक्री झाली. यामुळे शेतकऱ्यांना इतर कामासाठी
अधिकचा वेळ मिळाला असे अनेक फायदे झाले. हा कार्यक्रम असाच असून यातूनही अनेक शेतकऱ्यांना
लाभ मिळेल या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रशंसा होत आहे. यामुळे त्यांनी
सर्व सहभागी शेतकरी आणि शास्त्रज्ञांचे आणि आयोजकांचे आभार म्हणून अभिनंदन केले
आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी,
सध्या आंबा पिकावर समस्या येऊ शकतात, या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे
आणि शेतकऱ्यांना आंबा पिकासह इतर शेती विषयक समस्या उस्फूर्तपणे विचाराव्यात असे आवाहन
केले.
प्रस्ताविकात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख
यांनी केले. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी रेशीम तज्ञ कृषी मित्र श्री सोपानराव
शिंदे यांनी त्यांच्या रेशीम उद्योगातील यशोगाथा शेतकऱ्यांना सांगून त्यांनी रेशीम
व्यवसायात यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण बाबी नमूद केल्या.
या कार्यक्रमात संपूर्ण मराठवाड्यातून गटाने शेतकरी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. संजय पाटील, डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. सूर्यकांत पवार आदी शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.