Monday, February 17, 2025

विद्यापीठाने घडविलेले लातूर जिल्ह्याचे श्री. शिंदे श्रीकृष्ण यांना आयएआरआय २०२५ इनोव्हेटिव्ह फार्मर पुरस्कार

 

भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (IARI) ने कृषि क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल लातूर जिल्ह्याचे प्रगतशील शेतकरी श्री. शिंदे श्रीकृष्ण सदाशिवराव यांची आयएआरआय २०२५ (IARI – 2025) इनोव्हेटिव्ह फार्मर अवॉर्ड साठी निवड केली आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना २२  ते २४ फेब्रुवारी दरम्यान भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली येथे आयोजित पुसा कृषि विज्ञान मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे.

श्री. शिंदे श्रीकृष्ण सदाशिवराव यांनी आधुनिक शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून कृषी क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घडले असून त्यांनी ही मोठी उपलब्धी मिळवली आहे. यामुळे त्यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, विस्तार विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांचे आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे आभार मानले. याबरोबरच विद्यापीठाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.