Thursday, February 13, 2025

वनामकृवि आणि नागपुर येथील इंडियन टोबॅको कंपनी लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि नागपुर येथील इंडियन टोबॅको कंपनी लि. यांच्या मध्ये दि.  ११ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्वारी पिकांची उत्पादक्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आधुनिक तंञज्ञानाचा प्रसार शेतक-यांपर्यंत होणे ही काळाची गरज असुन या सामंजस्य करारामुळे विद्यापीठ शास्ञज्ञ आणि इंडियन टोबॅको कंपनी (आयटीसी) संयुक्तपणे कृषि तंञज्ञानाचे प्रसार करण्याचे कार्य करणार आहे.

सामंजस्य करारावर कृषि विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी तर आयटीसी कंपनीच्या वतीने आयटीसी - अॅग्री बिजनेस डिव्हीजन, एन. बी. डी. मार्सचे उपाध्यक्ष  श्री. राहूल गौराह, यांनी स्वाक्षरी केली.  

यावेळी बोलताना माननीय कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी देशात योग्य तंञज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत योग्य माध्यमातुन पोहचणे काळाची गरज आहे. आज शेतकरी हवामान बदल, बाजार भाव अशा विविध बाबींशी झुंज देत आहे. अशा वेळी शेतक-याला शाश्वत बाजारपेठ भेटने व मालाची विक्री योग्य दरात होण्या करिता एक योग्य माध्यम उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी हा करार लाभदायक ठरणार आहे असे प्रतिपादन केले. याबरोबरच प्रामाणिक आणि सचोटीने शेतक-याच्या उन्नतीसाठी दिवस राञ कार्य करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

हया करारावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान  आसेवार, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एच. व्ही. काळपांडे, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल. एन. जावळेविद्यापीठातील शास्ञज्ञ डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. प्रविण कापसे, डॉ. खंदारे, डॉ. जी. एम. कोटे, सौ. प्रितम भुतडा, आयटीसीचे अधिकारी कु. अणिता चिलवंत आणि श्री. प्रदीप राय आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन डॉ. मदन पेंडके यांनी केले तर आभार प्रितम भुतडा यांनी केले.