Tuesday, February 11, 2025

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

शिवशाहीर रामानंद उगले यांनी पोवाड्याच्या माध्यमातून घडविले शिवदर्शन !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५  च्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात शिवजन्मोत्सानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून दिनांक ११ फेब्रुवारी (मंगळवारी) रोजी शाहीर रामानंद उगले यांचा "शाहिरी शिवदर्शन" पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ .राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ .रावसाहेब भाग्यवंत, डॉ रणजित चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दलचा आदर्श सांगितला व तसेच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार  यांनी शिवाजी महाराजांचा आदर्शावर मार्गदर्शन केले. कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ले भ्रमंती करा असे तरुणांना आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ .सय्यद इस्माईल  यांनी केले.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण  शिवशाहीर रामानंद उगले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन दर्शन पोवाडाच्या माध्यमातून तसेच  गोंधळ, भारुड  यासारखे मनमोहक कलाप्रकार त्यांनी सादर केले. सर्व सभागृह शिवमय झाले होते. महाराष्ट्रातील कलाप्रकार पोवाडा याच्या माध्यमातून तरुणांना शिवाजी महाराजांचा आदर्श समोर करून शिवजयंती कशी साजरी करावी याबद्दल  त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी मधुर गायनाने शिवकालीन दर्शन घडवून दिले.

सूत्रसंचालन किशोर जाधव यांनी केले तर आभार जिमखाना उपाध्यक्ष डॉ .रावसाहेब भाग्यवंत यांनी मानले.