आयोजकांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान या विषयावरील दहा दिवशीय लघु अभ्यासिकेचे आयोजन दिनांक २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. अतिशय सुरेख असा दहा दिवसाचा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. या अभ्यासिकेचा यशस्वी समारोप दिनांक ५ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते. व्यासपिठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, लघु अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळवे आदी उपस्थित होत.
अध्यक्षीय समारोपात
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नमूद केले की, अतिशय
प्रभावीपणे दहा दिवस लघु अभ्यासिका संचालक आणि त्यांच्या समूहाने
प्रशिक्षणार्थींना जवळपास वेगवेगळ्या ३८ तासिका मधून फाइटो-मायक्रोबायोमचे ज्ञान
दान केले, याचा अभिमान वाटतो. सहभागी शास्त्रज्ञ या ज्ञानाचा
नक्कीच प्रभावी उपयोग करतील आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांची उन्नती
साधण्यासाठी उपयोगात आणतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
विस्तार शिक्षण संचालक
डॉ. गिरधारी वाघमारे म्हणाले की, अतिरिक्त रासायनिक औषधाचा
वापर कमी करण्यासाठी या प्रशिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर करून
फाइटो-मायक्रोबायोमचा शेती उत्पादनात वापर वाढवण्यासाठी कार्य करावे. सहयोगी
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी प्रशिक्षणार्थींना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग
आपल्या विद्यापीठात करावा आणि शेतकऱ्यांना अधिक अधिक लाभ द्यावा असे आवाहन केले.
अभ्यासिकेत पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू
काश्मीर, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र या सात राज्यातील २५ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. यातील
प्रशिक्षणार्थींनी प्रातिनिधिक स्वरुपात प्रतिक्रिया दिल्या. प्रशिक्षणार्थीं म्हणाले की, शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व
आणि तंत्रज्ञान या विषयावरील दहा दिवशीय लघु अभ्यासिकेत वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
पातळीवरील तज्ज्ञांचे तसेच प्रगतशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञान मिळाले.
विशेषतः माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्याख्यानामुळे प्रोत्साहन
मिळून कार्य करण्यासाठी उर्जा मिळाली. याबरोबरच विष मुक्त कृषि उत्पादन
वाढविण्यासाठी फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका महत्वाची आहे. यामुळे या अभ्यासिकेतून
मिळालेल्या ज्ञानाद्वारे उत्कृष्ठ संशोधन करून त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसार करून
देशपातळीवर शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसाठी लाभ देण्याचे कार्य करू अशी ग्वाही दिली.
विद्यापीठाचे बायोमिक्स
उत्पादन,
ॲग्री-पीव्ही प्रकल्प, टिशू कल्चर ही
विद्यापीठाचे उत्कृष्ट कार्य असल्याचे मत व्यक्त केले. बायोमिक्स द्वारे
फाइटो-मायक्रोबायोमचे महत्त्व या विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पटवून
दिलेले आहेत. हे उत्पादन शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात
याचा वापर करत आहे हे खरोखरच वाखणण्याजोगी बाब आहे, अश्याही प्रतिक्रिया दिल्या
विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी मध्यवर्ती
प्रक्षेत्राचा विकास करून शेतकरीभिमुख कार्य करत असल्याचे जाणवले. मागील काही वर्षात
लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत असून विद्यापीठांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन
केंद्रे निर्माण करण्याची क्षमता आहे अशी
एका शास्त्रज्ञानी प्रतिक्रिया देवून त्यांनी विद्यापीठाच्या मध्यवर्ती
प्रक्षेत्राची तुलना हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धशुष्क कटिबंधीय पिक संशोधन
संस्थेच्या (ICRISAT) प्रक्षेत्रासोबत केली.
प्रतिक्रिया देणाऱ्या
प्रशिक्षणार्थींमध्ये डॉ. प्रसाद (कर्नाटक), डॉ.
मल्लिकार्जुन (कर्नाटक), डॉ. पॉली शहा (पश्चिम बंगाल),
डॉ. जहूर ( काश्मीर), डॉ दीपक पानपट्टे
(महाराष्ट्र), आदींचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान लघु अभ्यासिकेच्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल
लघु अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळवे
डॉ. जहूर ( काश्मीर)