Monday, February 10, 2025

शेती माझी पिढी, शेती माझा वंश, रक्तामध्ये अंश, मातीचाच!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 परभणीच्या भाजीपाला उत्पादक गटाचा स्नेह मेळावा



परभणी येथील भाजीपाला उत्पादक गटाचा स्नेह मेळाव्याचे दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मौजे पेडगाव (ता. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री विजय जंगले यांच्या संत्र्याच्या बागेमध्ये अतिशय उत्कृष्टपणे आयोजन केले. या स्नेह मेळाव्यास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, परभणी जिल्ह्याचे माननीय जिल्‍हाधिकारी श्री रघुनाथ गावडे सर (भाप्रसे), शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण  नखाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दौलत चव्हाण, जिल्हा परिषदेचे  कृषी विकास अधिकारी श्री. दीपक सामाले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेती माझी पिढी, शेती माझा वंश, रक्तामध्ये अंश, मातीचाच! असे गौरवद्गार काढले. ते पुढे म्हणाले की, आपला शेतकरी राजा सुखी असावा यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायलाच हवेत. याचाच भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील संवेदनशील, शेतीविषयी मनात आपुलकी असणारे माननीय जिल्‍हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

यामध्ये शेतरस्ते व्यवस्थीत करून फळबाग, भाजीपाला उत्पादन वाहतूक सोयीस्कर होईल. शेतीतील कामे करण्यासाठी आधुनिक यंत्रे, अवजारे, वाहतूक सोपी होईल. याबरोबरच आधुनिक 'तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये आपण वापरू शकणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे चांगले, सकारात्मक दिवस येतील हे नक्की. जिल्ह्यातील शेती व शेतकरीसाठी भरभराट आली पाहिजेत यासाठी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपले विचार मांडले . सदैव नव नविन प्रयोग पाहणे व ते शेतीमध्ये राबवणे यातच शेतकर्‍यांचे हित असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री दत्तू शेवाळे म्हणाले तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण यांनी  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बायोगास कडे वळावे असे आवाहन केले.

जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री दीपक सामाले, विद्यापीठाचे डॉ. जावळे, डॉ. गजानन गडदे,  डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. संतोष फुलारी, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. बी एम मोरे, डॉ.नरवाडे, अतिरिक्त शिक्षणाधिकारी श्री. गणेश शिंदे, श्री राजेश गर्जे, पत्रकार श्री. सुरज कदम, प्रगतशील शेतकरी श्री.रत्नाकर ढगे यांनी सहकुटुंब हजेरी लावून मेळाव्याचा उत्साह वाढविला. तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि भाजीपाला उत्पादक गटाचे सन्माननीय सदस्य तथा प्रगतशील शेतकरी असे जवळपास २५० शेतकरी आणि अधिकारी महिला आणि पुरुष  यांच्या उपस्थितीत स्नेह मेळाव्याचा कार्यकम यशस्वी पार पडला. मेळाव्या दरम्यान सर्व मान्यवरांनी वनभोजनाचा आणि संत्रा फळाचा आनंद लुटला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. स्नेह मेळाव्यातून शेतकरी व अधिकारी यांची जवळीक निर्माण होऊन एकंमेकाचा विचाराची देवान - घेवान झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती घोडके यांनी केले तर आभार श्री. जनार्धन आवरगंड  यांनी मानले.

बैठकीच्या आयोजनासाठी प्रगतशील शेतकरी श्री विजय जंगले, श्री पंडित थोरात, श्री जनार्दन आवरगंड श्री रामेश्वर साबळे, श्री प्रकाश हारकळ यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. विद्याधर संघई, श्री. रमेश राऊत, श्री. सजय ठोंबरे, श्री. शिवा ठोंबरे, श्री. अमोल गायकवाड, श्री. कृष्णा घुले, श्री. कुलदीप देशमुख, श्री. शंतनु देशमुख, सौ.सोनाली, सौ. चव्हाण, प्रियंका सामाले, सौ.प्रफुला, सघई, सौ.मीरा आवरगंड, सौ.मीरा साबळे, सौ. अर्चना थोरात, सौ.सीमा जगले, सौ. स्वाती घोडके हे सर्व सहकुटुंब उपस्थित राहून त्यांनी परिश्रम घेतले.