वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल
भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प- कृषिरत महिला अंतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी
दैठणा आणि सनपुरी तालुका जिल्हा परभणी येथे विशेष क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला कृषिरत
महिला योजनेच्या केंद्र समन्वयिका डॉ.
नीता गायकवाड, रेशीम
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, परभणी
जिल्हा रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी, श्री.गोविंद
कदम, दैठणा गावच्या सरपंच श्रीमती. उज्वला
कच्छवे आणि सनपुरी गावच्या उपसरपंच श्रीमती. गोदावरी सुगंधे , प्रगत शेतकरी कृषी
भूषण मा. श्री. बाळासाहेब शिंदे, आदींची उपस्थिती होती.
डॉ. नीता गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक करून शेतकरी महिलांना अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प- कृषिरत
महिला अंतर्गत दि. २७ ते २९ जानेवारी २०२५ व दि. २९. ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान
अनुसूचित जाती शेतकरी महिलासाठी विशेष क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठात
रेशीम उत्पादन व उद्योग याबरोबरच गांडूळखत
निर्मिती यांचे प्रशिक्षण दिले. त्याच्या पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र
शासनाच्या योजनांचा लाभ या महिलांना मिळण्यासाठी प्रयत्न करणे, या अनुषंगाने जिल्हा रेशीम कार्यालाशी सलग्न करून महिलांच्या उपजीविका सुरक्षिततेसाठी
कार्य करण्याचा एक महत्त्वाच्या टप्पा
असल्याचे प्रतिपादित्त केले.
डॉ. चंद्रकांत लटपटे, यांनी रेशीम उत्पादन तंत्रज्ञान सांगितले. यामध्ये त्यांनी निगा आणि स्वच्छता यावर शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले व शेतकरी महिलांना रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या आवश्यक तुती लागवडीचे आवाहन केले. श्री जी.आर. कदम यांनी रेशीम शेती विषयक शासकीय योजनांची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचे महारेशीम अभियान २०२५ साठीचे अर्जाची अंतिम तारीख दिनांक १५.२.२०२५ आहे व तो अर्ज कशा पद्धतीने दाखल करण्यात यावा याची सखोल माहिती दिली. त्यांनी आवश्यक ती शासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमा दरम्यान शेतकरी महिलांचे अनेक गट या महा रेशीम अभियान नोंदणीसाठी उत्सुकतपणे तयार झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यंग प्रोफेशनल श्री. प्रसाद देशमुख, श्रीमती संध्या शिंदे व श्रीमती नवाल चाऊस, श्री. मिसाळ, क्षेत्र सहाय्यक यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दैठणा गावातील श्रीमती इंदुमती वीरकर, श्रीमती शितल कच्छवे आणि श्रीमती अपर्णा कच्छवे आणि सनपुरी गावातील श्रीमती कल्पना सुरेश सुगंधे, श्रीमती पंचशीला रंगनाथ सुगंधे आणि श्रीमती शारदा अनिल सुगंधे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला जवळपास ६४ शेतकरी महिला आणि १२ शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दैठणा आणि सनपुरी येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.