परभणी
येथील पी डी जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या शैक्षणिक वर्ष
२०१८ – १९ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ दिनांक २८ फेब्रुवारी
रोजी संपन्न झाला. या समारंभाकरिता प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. अध्यक्षस्थानी
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री उदयराजजी जैन हे होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे, परभणी येथील
प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. अप्पाराव शेळके आदींची उपस्थिती होती.
यावेळी
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्तिमत्व विकासातील
विविध पैलू विद्यार्थ्यांना सांगितले. कठोर मेहनत, स्वयंशिस्त, प्रामणिक प्रयत्न,
करून स्वतःला जीवनात आदर्श व्यक्तिमत्व बनवावे. विद्यार्थ्यानी संस्कार, नीती,
मुल्ये जपावेत आणि वडीलधाऱ्या व्यक्तिंचा मान ठेवण्याचे आवाहन केले. कृषि
विद्यापीठांमध्ये होमिओपॅथिक शास्त्रासोबत संशोधन करण्यास विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन
करण्यात येईल, यासाठी विद्यार्थांनी विद्यापीठास भेट द्यावे असे नमूद केले.
कार्यक्रमात माननीय कुलगुरू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण
करण्यात आले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभाडे यांनी करून पदवी प्राप्त
विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठासोबत कार्य करून
होमिओपॅथीशास्त्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी संशोधन करण्याचा
मानस व्यक्त केला.
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील इंटरशीप मधील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी तथा
विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.