वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP)
अंतर्गत दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पास संशोधन संचालक माननीय डॉ. खिजर बेग यांनी दिनांक
७ फेबुवारी रोजी भेट दिली. त्याच्या समवेत सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल,
मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य आणि शास्त्रज्ञ डॉ. अनिल धमक आदींची उपस्थिती होती.
या भेटीदरम्यान संशोधन संचालक माननीय डॉ. खिजर बेग यांनी दीर्घकालीन खतप्रयोगासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय व अजैविक खतांच्या दीर्घकालीन परिणामामुळे मृदा आरोग्य आणि पिकांच्या उत्पादकतेत झालेल्या ठळक फरकांचे निरीक्षण केले. विशेषतः मागील १९ वर्षात दीर्घकालीन खतप्रयोगामुळे पीक चक्राच्या शेवटी झालेल्या बदलांवर त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे संशोधनास नवीन दिशा मिळाली असून, भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत फलदायी ठरली. अशी प्रतिक्रिया दीर्घकालीन खतप्रयोग प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी दिली आणि मान्यवरांचे आभार मानले.