माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी
येथे व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीच्या वतीने कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दिनांक
१७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. या मुलाखती
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या.
या मुलाखतीस एकूण २३
विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कंपनीने कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या पदवीधारक विद्यार्थ्यांची निवड केली असून, त्यांना
प्रशिक्षण कालावधीत वार्षिक रुपये ४ लाखांहून अधिक पगाराचे प्रारंभिक पॅकेज
देण्यात आले आहे. या शुभप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. टी. रामटेके आणि
एजीएम इंजी. शेख नूर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर वितरित
करण्यात आले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या मुलाखतीचे समन्वयक कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे प्रा. डी. व्ही. पाटील आणि डॉ. एम. आर. मोरे यांच्याद्वारे करण्यात आले.