विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना सात राज्यातील २५ शास्त्रज्ञांच्या भेटी: माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली अभ्यासदौरा
या अभ्यासदौऱ्यादरम्यान
विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये विद्यापीठाच्या नव्याने
विकसित मध्यवर्ती प्रक्षेत्रास भेट देवून यांत्रिकराणातून जमीन विकास आणि गोदावरी
तूर पिकासाठी अवलंबलेले नवनवीन तंत्रज्ञान व संशोधन तसेच गुणवत्ता युक्त
बीजोत्पादन क्षेत्र पाहण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर ‘J फार्म’
याठिकाणी भेट देवून कृषी यांत्रिकीकरणाच्या आणि ट्रॅक्टरचे कट मॉडेलद्वारे
प्रकल्पाची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. सेंद्रिय शेती प्रकल्पातून
पर्यावरणपूरक शेतीच्या प्रकल्पाविषयी माहिती घेण्यात आली. ड्रोन द्वारे फवारणी या
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत कसा वापर करता येईल याचे प्रात्यक्षिक सादरीकरण
करण्यात आले. दीर्घ कालीन खत प्रयोगाच्या संशोधनातून करडई सारख्या पिकातील खताच्या
वापराच्या संशोधनाबाबत माहिती घेण्यात आली. अन्न तंत्र महाविद्यालयातील गूळ आणि रस
इन्क्युबेशन सेंटरमधून प्रक्रिया
उद्योगाच्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख उद्योजकता विकासाकरिता करून देण्यात आली.
रेशीम संशोधन केंद्राद्वारे रेशीम उद्योगाच्या
संशोधन कार्याचा अभ्यास करण्यात आला, तर जैव कीटकनाशक युनिट
व कीटकशास्त्र विभागाच्या भेटीतून जैविक
कीटकनाशके आणि कीटक व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करून शास्त्रज्ञानी माहिती घेतली.
दुसऱ्या दिवशी (२ फेब्रुवारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड
यांच्या सामंजस्य करारातून मानवत येथील ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधन
प्रकल्पास भेट दिली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतजमिनीवर सौर ऊर्जा
निर्मिती आणि पिक लागवड या दुहेरी लाभाची तसेच ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान उपकरणाची प्रभावी उपयुक्तता
आणि हाताळणी तंत्रज्ञाची माहिती घेतली.
या अभ्यासदौऱ्यातून
मराठवाड्याच्या विकासाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मोलाचे
योगदान असल्याचे मत सहभागी शास्त्रज्ञानी व्यक्त करून याप्रमाणेच आपल्या संभधित
राज्यात या तंत्रज्ञाचे माहिती देवून या विद्यापीठाचे कार्य पोहचले जाईल असे भावना
व्यक्त केल्या.