वनामकृवित पहिली विज्ञानजत्रा संपन्न
भारत वाशियामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोनाची रुजवणूक करण्याकरिता आणि मानवी कल्याणासाठी देशात दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्कुल कनेक्ट अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी परभणीतील पहिली विज्ञानजत्रा दिनांक ८ फेब्रुवारी (शनिवार) रोजी संपन्न झाली. विज्ञानजतत्रेचे विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजुस असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञानजत्रेचा समारोप
समारंभ दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी विद्यार्थ्यांच्या
मनात विज्ञानाची ज्योत सातत्याने तेवत ठेवण्याकरिता सतत प्रयत्नशील असलेले माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. विज्ञान
संकुल निर्मितीत सिंहाचा वाटा असलेले आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन
विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहून विज्ञान संकुलासा जागतिक दर्जाचे बनविण्याचे कार्य
करत असलेले माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे मुख्य
अतिथी होते आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबिणारे शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार तसेच लोकप्रिय आणि ॲस्ट्रॉनॉमिकल
सोसायटीचे मुख्य प्रवर्तक डॉ रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञानजत्रेत
सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती प्रमाणपत्र
देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विज्ञान संकुलची (सायन्स पार्क) निर्मिती करण्याची ज्यांच्या मनात कल्पना आली असे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील आणि डॉ.रामेश्वर नाईक यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विज्ञानामुळे व्यापक दृष्टिकोन निर्माण होतो, म्हणून जो विज्ञानाला प्रोत्साहन देऊन वृद्धी करतो तोच खरा देश सेवक आहे. परभणी जिल्ह्याचे भूषण म्हणून भविष्यात हे विज्ञान संकुल भविष्यात पुढे येईल. शेती उत्पादनात कापसासारख्या पिकाचे देशात अव्वल स्थानावर आणण्याचा निर्धार आजच (८ फेब्रुवारी) परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमात शास्त्रज्ञाद्वारे करण्यात आलेला आहे. याबरोबरच आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाचे कार्य अति वेगाने सुरू आहे. ही संस्था विज्ञान प्रदर्शने, व्याख्याने, विज्ञानजत्रा, विज्ञानवारी असे विद्यार्थासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत आहे. या जत्रेतून विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाशी जोडण्याचा दृष्टीने स्कूल कनेक्ट कार्यक्रमांतर्गत त्यांनी साकारलेले प्रयोगांना विद्यापीठात व्यापक स्वरूप देऊन सत्यात आणण्यासाठी कार्य केले जाईल. महाराष्ट्रात शालेय शिक्षणात कृषीचा शिक्षणाचा समावेश केलेला आहे. यामुळे शेतीमध्येही विद्यार्थ्यांद्वारे नवनवीन प्रयोग राबविले जातील. यातून शेतीसाठी उच्च तंत्रज्ञान मिळून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण करण्याचे कार्य केले जाईल. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रयोगाचे माननीय कुलगुरू यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम जागृत ठेवावे याबरोबरच जिद्द, चिकाटी, शिस्त, कठोर मेहनत, अभ्यास करण्याचा सल्ला देऊन त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
माननीय आमदार डॉ. राहुल
पाटील यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुलाच्या निर्मितीचा इतिहास सांगितला. या
संकुलातून शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत ही भावना ठेवली आहे. ते पुढे म्हणाले की,
प्रत्येक विद्यार्थ्यात चिकित्सक वृत्ती, कला गुण असतात, ते व्यक्त होण्यासाठी
त्यांना व्यासपीठ लागते, ते या विज्ञान संकुलाच्या रूपाने आम्ही देत आहोत. या
विज्ञान संकुलास जागतिक पातळीवर पोहोचवण्याचे मानस आहे. याच्या अत्याधुनिकरणासाठी
लागणारा निधी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करून तो शासन पातळीवरून उपलब्ध करणार आहोत
असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ असून ते ड्रोन वापराबाबतचे मापदंड ठरविणाऱ्या
समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे ही विद्यार्थ्याना संशोधक
बनविण्यासाठी परभणीस जमेची बाजू आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन
माननीय शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या हस्ते सकाळच्या सत्रात झाले. यावेळी
नांदेड विभागाचे विक्री व सेवा करचे
आयुक्त श्री आशिष शेवाळकर, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे डॉ रामेश्वर नाईक, सहयोगी अधिष्ठाता
डॉ राजेश क्षीरसागर, डॉ विश्वनाथ खंदारे, राजेश्री ग्रुपचे श्री अरुण पाटील,
अल्फाचे श्री अडकीने आदी उपस्थित होते.
शिक्षण संचालक डॉ.भगवान
आसेवार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात कार्यक्रमाचची प्रसंशा केली. तसेच ग्रामीण
भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयक विचार रुजविण्यासाठी
असे उपक्रम फायदेशीर ठरतात असे प्रतिपादन केले
प्रस्ताविकात डॉ.
रामेश्वर नाईक म्हणाले की, विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये
विज्ञानाविषयी असलेली परभणीकर यांच्या मनातील भावना सत्यात उतरत आहे. यातून
विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे. विज्ञान संकुल
निर्मितीमध्ये परभणीचे माननीय आमदार डॉ. राहुल पाटील आणि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मोलाचे
योगदान आहे असे नमूद केले
विद्यार्थ्यांनी या
विज्ञानजत्रेत कृषी क्षेत्राशी निगडित एकात्मिक शेती पद्धती, जल पुन:र्भरण,
जमिनीतील ओलावा दर्शक यंत्रणा, शून्य उर्जेवर आधारित साठवणूक यंत्रणा, सौर उर्जेवर
चालणारी शेती उपकरणे, यांत्रिकीकरणातून श्रम बचतीची साधने अशा विविध प्रयोगांची
मांडणी केली होती. यास स्कूल कनेक्ट अंतर्गत विद्यापीठात व्यापक स्वरूप देण्यात येणार
आहे.
या विज्ञानजत्रेत परभणी शहर आणि परिसरातील जवळपास ९० शाळांनी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांसह परभणी शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यापीठातील शास्त्रज्ञ अशा जवळपास ५००० हून अधिक विज्ञान प्रेमी समुदायांनी भेट दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विश्वनाथ खंदारे, विज्ञान संकुलाचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. रवी शिंदे, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे, डॉ. पी. आर पाटील, श्री ओम तलरेजा, श्री. सुधीर सोनुणकर, डॉ रणजीत लाड, श्री दत्ता बनसोडे, श्री प्रसाद वाघमारे, श्री अशोक लाड, श्री दिपक शिंदे, श्री नागेश वाईकर, डॉ. बाहुबली निंबाळकर डॉ विजय किसन नरवाडे, श्री प्रताप भोसले यांच्या सह कार्यक्रमासाठी गठित समित्यांच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.