सायन्स कॉलेज, नांदेड
यांच्या वतीने आयोजित ‘ग्रामीण विकास, शाश्वत
पर्यावरण आणि शेतीमध्ये लिंग सक्षमीकरणातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या आंतरराष्ट्रीय
परिषदेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ऑनलाईन
पद्धतीने संपन्न झाले. या परिषदेला ३०० हून अधिक मान्यवर, विद्वान
व तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, धोरणात्मक
सुधारणा आणि लिंग समानतेचे महत्त्व अधोरेखित केले. तज्ज्ञांनी पर्यावरणपूरक शेती
पद्धतींचा अवलंब आणि ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी स्त्री-पुरुष समानतेला चालना
देणाऱ्या धोरणांची गरज व्यक्त केली.
परिषदेत ग्रामीण विकास, शाश्वत
पर्यावरण आणि कृषी क्षेत्रातील समतोल वाढीवर व्यापक चर्चा झाली. तज्ज्ञांनी
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नवीन संकल्पना मांडल्या आणि कृषी क्षेत्राला प्रगत
तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दिशा देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.