जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठास, अभ्यास दौरा दरम्यान मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
नागपूर येथील प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र आणि मध्यप्रदेशच्या सायखेडा येथील जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) सभागृह, नागपूर येथे दोन दिवसांचा राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शनी – सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती या विषयावर भव्य आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समारंभास आयएनएम विभागाच्या माजी सहसचिव श्रीमती रानी कुमुदिनी, पद्मश्री शेतकरी डॉ. भारत भूषण त्यागी (बुलंदशहर, उत्तर प्रदेश), पद्मश्री शेतकरी श्री. चिंताला वेंकट रेड्डी (तेलंगणा), व्यक्ती विकास केंद्राच्या संचालक श्रीमती उमा माहेश्वरी प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्राचे संचालक डॉ. ए. एस. राजपूत, जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान शाळेचे अधिष्ठाता डॉ. केविन गवळी, श्रीमती जयश्री मिश्रा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या अंतर्गत दिनांक २३ फेब्रुवारी रोजी जी. एच. रायसोनी कृषी विद्यापीठास, अभ्यास दौरा आयोजित केला होता. या राष्ट्रीय परिसंवादात जैविक व नैसर्गिक
शेतीच्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषत: शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद
सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी जैविक शेतीत उल्लेखनीय यश मिळवलेल्या शेतकऱ्यांनी
आपल्या यशोगाथा सादर केल्या. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राज्य कृषि विद्यापीठ
आणि कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी जैविक शेतीच्या विविध तंत्रज्ञानावर
मार्गदर्शन केले.
या परिसंवादात पीजीएस-इंडिया प्रमाणित जैविक उत्पादने, तसेच
विविध जैविक निविष्ठा उत्पादकांनी आपली उत्पादने प्रदर्शनात मांडली. देशातील
सर्वोत्तम जैविक शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये मराठवाड्यातील हादगाव (जिल्हा नांदेड) च्या सुषमा देव आणि रुईभर (जिल्हा धाराशिव)
चे श्री सुरज जाधव यांचा समावेश होता. या
कार्यक्रमास परभणी विद्यापीठाचे सेंद्रिय शेतीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ आनंद गोरे,
मृदा शास्त्रज्ञा डॉ पपिता गौरखेडे, राष्टीय पातळीवरील विविध शास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि मध्यप्रदेश, गुजरात,
महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश,
छत्तीसगड आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाद्वारे जैविक व नैसर्गिक शेतीच्या प्रचार-प्रसाराला चालना मिळाली असून, शेतकऱ्यांनी जैविक शेतीचा अवलंब करून अधिक उत्पादन घ्यावे, असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.