कृषि विभागातर्फे तीन दिवस क्रीडा , कला सर्धेचे स्पर्धेचे आयोजन...
कृषि विभागातर्फे आयोजित क्रीडा व कला स्पर्धा 'कृषि तरंग महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.७ फेब्रुवारी) सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.राजेश कदम, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक श्री. दौलत चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी श्री आर.बी. हारणे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री. डी.टी. सामाले, तालुका कृषि अधिकारी नित्यानंद काळे (परभणी), लक्ष्मण शिंदे (जिंतूर), शेरखान पठाण (सेलू), गोविंद कोल्हे (पाथरी), प्रियांका कावरे (सोनपेठ),पी.आर. निरस (गंगाखेड), आबासाहेब देशमुख (पालम), संतोष भालेराव (पूर्णा), मंडल कृषि अधिकारी आदि उपस्थिती होते.
महोत्सवात मार्गदर्शन करताना
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की कृषि विभाग राज्यात बळीराजा
साठी चांगले काम करत आहे, आपला पोशिंदा बळीराजा यांची सेवा
करण्याची आपणास संधी मिळाली आहे हे आपले सुर्दैव आहे. प्रास्ताविकात श्री चव्हाण
म्हणाले या महोत्सवासाठी विविध खेळासाठी मैदान, व कला
कार्यक्रमाला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कुलगुरू यांचे आभार मानले ,
तसेच आपल्या सुप्त गुणांना सादरीकरण करण्यासाठी वाव मिळणार आहे.
या क्रीडा महोत्सवामध्ये कृषि विभागाचे सुमारे २५० खेळाडू सहभागी झाले आहेत. क्रिकेट ,हॉलीबॉल, खो-खो, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, कबड्डी, धावणे, बुद्धिबळ, टेबल टेनिस, चालणे, रस्सीखेच आदी १९ क्रीडा प्रकार तसेच,सुगम गीत गायन फिशपॉण्ड आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आबासाहेब देशमुख, आणि तंत्र अधिकारी पूजा थिटे यांनी केले.तर आभार प्रदर्शन मंडळ कृषि अधिकारी कैलास गायकवाड यांनी मानले. उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.