सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची
जयंती मोठ्या उत्साहात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. छत्रपती
शिवाजी महाराजांचे राष्ट्रप्रेम, स्वाभिमान, अन्यायाचा प्रतिकार, धैर्य, शौर्य,
साहस, बुद्धी प्रामाण्यवाद, स्त्री दाक्षिण्य, सर्वधर्म समभाव, प्रजाहित दक्षता, गुणग्राहकता भविष्य वेध घेण्याची
क्षमता, शेतकरी व सामान्य जनता यांच्या प्रति असलेले उत्तरदायित्व
आदि विशेष गुणांचा युवकांनी अंगिकार करणे
गरजेचे असल्याचे मत यावेळी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जया
बंगाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज
जयंती निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने 'जय शिवाजी जय भारत'
पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. लेझीम पथकाने यावेळी विशेष रंगत
आणली. पदयात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने विद्यापीठाचा परिसर
दणाणला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने श्रावणी जाधव, अपूर्वा लांडगे, किरण काळे, संकेत
चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. तर वैष्णवी अंभोरे व स्नेहा भदर्गे छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पाळण्यावर यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख
डॉ.विजया पवार, डॉ. नीता गायकवाड डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. विद्यानंद मनवर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील
विद्यार्थी तथा कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.