Sunday, February 17, 2013

शेतीच्‍या शाश्‍वत विकासासाठी पाणलोट क्षेत्राचा विकासाशिवाय तरणोपाय नाही ........ कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे

     बदलत्‍या हवामान परिस्थितीमध्‍ये शेतीच्‍या व फळबागांच्‍या शाश्‍वत विकासासाठी पाणलोट क्षेत्राचा विकासाशिवाय तरणोपाय नाही, या भागात त्‍यासाठी मोठा वाव आहे  असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मा डॉ किशनराव गोरे यांनी केले.
    मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्‍तार शिक्षण संचालनालयामार्फत लिंबुवर्गीय फळपिकांवर मराठवाडयाकरिता तंत्रज्ञान अभियानातंर्गत मोसंबी बागायतदारांचे प्रशिक्षण मेळावा कृषि विभागाच्‍या सहकार्याने औरंगाबाद जिल्‍हयातील पैठण तालुक्‍यातील थाप‍टी तांडा, देवगांव येथे दि 16 फेब्रूवारी 2013 रोजी आयोजीत मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्‍हणाले कि, पडलेल्‍या पाउसाचे पाणी आडवीने व जिरवीणे गरजेचे असुन त्‍या पाण्‍याच्‍या तंतोतंत वापरासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतावरी यासारखे उपक्रमाव्‍दारे विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावर त्‍यांच्‍या समस्‍या सोठविण्‍यासाठी येत आहेत.
    या कार्यक्रमास विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, राष्ट्रिय फलोत्‍पादन अभियानाचे आयुक्‍त मा श्री गोरखसिंग व महाराष्‍ट्र राज्‍य फलोत्‍पादन विभागाचे संचालक मा श्री डि जी बकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच औरंगाबाद विभागाचे कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, जिल्‍हा कृषि अधिक्षक श्री डि आय गायकवाड उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतक-यांनी माती परिक्षण करूनच फळपिकांसाठी उपयुक्‍त जमीनीवर लागवड करावी, गेली दोन महिने विद्यापीठ मराठवाडयातील टचांईग्रस्‍त मोसंबीबांगादाराना लिंबुवर्गीय फळपिकांसाठी तंत्रज्ञान अभियानातंर्गत कृषि विभागाच्‍या सहकार्याने मेळाव्‍यातुन मार्गदर्शनकरित आहे याचा निश्चितच फायदा होतांना दिसत आहे.
     याप्रसंगी टचांईग्रस्‍त मोसंबीबांगाचे व्‍यवस्‍थापन या विषयावर डॉ एम बी पाटील यांनी तर कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ एम बी सरकटे, लागवड तंत्रज्ञानावर डॉ एस पी जिंतुरकर, योग्‍य जमीनीची निवड यावर डॉ पी डब्‍ल्‍यु एंगडे, रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ पी एम ठोंबरे आदींनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री दिपक जोशी यांनी केले. मेळावा यशस्‍वीतेसाठी डॉ एन डी देशमुख, तालुका कृषि अधिकारी श्री जी एम पायघन, श्री शहादेव ढाकणे, उपसंरपंच श्री अर्जुन ठोकळ व कृषि विभागातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास परिसरातील फळबागायतदार मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील टचांईग्रस्‍त मोसंबीबांगाना मान्‍यवरांनी व शास्‍त्रज्ञांनी भेटी दिल्‍या.





Friday, February 1, 2013

डॉ. व्ही. प्रवीणराव यांचे व्याख्यान

परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमी तर्फे कृषिविद्या विभागात डॉ. व्ही. प्रवीणराव यांचे व्याख्यान

    ता.२३ जानेवारी रोजी मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषिविद्या विभागामध्ये हैदराबाद येथील आचार्य एन.जी.रंगा कृषि विद्यापीठ अंतर्गत जल व्यवस्थापन केंद्राचे संचालक डॉ.व्ही.प्रवीणराव यांनी भेट देली. डॉ.प्रवीणराव यांचा परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ अग्रोनोमी तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी, डॉ. प्रवीणराव यांनी कृषिविद्या विभागाच्या प्रक्षेत्राची पाहणी करून प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधन प्रयोगाचा आढावा घेतला. विभागाचे प्राध्यापक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या संशोधन प्रयोगाबद्दल व प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या प्रात्यक्षीक पीक व बिजोत्पादनाबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. डॉ.प्रवीणराव यांनी जलस्त्रोत संरक्षणार्थ सूक्ष्म सिंचनाचे तंत्र आणि जल उत्पादकता वाढविण्याचे उपाय” याविषयावर व्याख्यान दिले तसेच भविष्यातील संशोधनातील अडचणी व त्याचे निरसनात्मक नियोजन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डी. एन. गोखले, डॉ. डी. ए. चव्हाण, डॉ. ड्ब्लु. एन. नारखेडे, डॉ.यू.एम.आळसे, डॉ.ए.एस.जाधवडॉ. के. टी. जाधवडॉ. ए. एस. कारलेडॉ. एस. इस्माईल, डॉ. ए. टी.शिंदे, डॉ.एस.बी.घुगे, डॉ.जी.आर.हानवंते, डॉ. व्ही. बी. अवसरमल, प्रा.जी.डी.गडदे, डॉ.डी.सी.लोखंडेडॉ. जी. ए. भालेरावप्रा. एस. यू. पवार, प्रक्षेत्र अधीक्षक पी. के. वाघमारे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. मेघा सूर्यवंशी, श्रीमती आशालता झोटे, कु. ममता पतंगे, कु.ज्योती गायकवाड आणि पदव्युत्तर व आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.  

Saturday, January 26, 2013

राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप


    विस्ताराकांनी व शिक्षकांनी आपली गुणवत्‍ता सुधारण्‍यासाठी अधिकाधीक मेहनत घ्‍यावी. ग्रामीण भागातील लोकांचे व शेतकरयांचे जीवनमान सुधारण्‍यासाठी आवश्‍यक शास्‍त्रीय माहीती त्‍यांच्‍या पर्यत पोहचविण्‍यात प्रसारमाध्‍यमाचा व माहीती तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचे कौशल्‍य कृषि शास्‍त्रज्ञ व विस्ताराकांना अवगत पाहिजे असे प्रतिपादन मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे यांनी केले.
   मराठवाडा कृषी विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली प्रायोचित 'विस्ताराकांसाठी संवाद व व्यवस्थापन कौशल्य' या विषयावर राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षणाचे  १६ ते २५ जानेवारी २०१३ दरम्यान आयोचन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे यांची उपस्थिती होते. 
   या प्रशिक्षण कार्यक्रमात प्राप्‍त ज्ञानाचा आपल्‍या व्‍यक्‍तीगत जीवनात उपयोग करावा असा सल्‍लाही सहभागी प्रशीक्षणार्थीना मा. कुलगुरूनी दिला.     
   शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे  यांनी गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता प्रा विशाला पट्टणम, विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल व प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीरीत्‍या पुर्ण केल्‍याबददल अभिनंदन केले.
    यावेळी मा डॉ किशनराव गोरे यांनी कुलगूरूपदाचा दोन वर्ष यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍याबददल सत्‍कार करण्‍यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात देशातील विविध कृषी विद्यापीठातील २५ शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विस्तारक सहभागी झाले होते. या प्रशीक्षणार्थीना आपले मनोगत यावेळी व्‍यक्‍त केले. प्रशिक्षणात विस्ताराकांसाठी आव्यशक संवाद व व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा कृषी विकासात उपयोग, व्यक्तीमत्व विकास, विविध प्रसारमाध्यमांसाठी आव्यशक कौशल्य या विषयावर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन केले. गृहविज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्या प्रा विशाला पट्टणम यांनी प्रास्ताविक केले तर विभाग प्रमुख डॉ प्रभा अंतवाल यांनी आपल्या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ प्रवीण कापसे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी आदीं मोठया संख्येने उपस्थित होते.  
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपा प्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे व्यासपीठावर  डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल आदी 
मकृवितील गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विस्तार व संवाद व्यवस्थापन विभागाच्यावतीने राष्ट्रस्तरीय दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या समारोपा प्रसंगी  सहभागी प्रशीक्षणार्थी समवेत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे, डॉ विश्वास शिंदे , प्रा विशाला पट्टणम, डॉ प्रभा अंतवाल, डॉ प्रवीण कापसे आदी 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याची नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास भेट दिली

देशाचे सरासरी राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी कृषी उत्पन्नात वाढ आव्यशक आहे, यासाठी गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण पाहिजे, त्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व मनुष्यबळ विद्यापीठाने निर्माण केल्या पाहिजेत. त्यादिशेने मराठवाडा कृषी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादास व आचार्य पदवीसाठी देशातील विविध विद्यापीठात पाठविण्यात येत आहे  विद्यार्थांना ही द्विपदवीच्या संधी प्राप्त करून देण्यात येत आहे असे प्रतिपादन कुलगुरू मा.डॉ.किशनराव गोरे यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उच्चस्तरिय अधिकाऱ्याच्या भेट दरम्यान केले.

दि २४ जानेवारी रोजी  मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठतील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी भेट दिली. यामध्ये संशोधन संचालक डॉ एस व्ही सरोदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ व्ही के माहोरकरशिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ व्ही एम भाले, डॉ डी ए भारती आदींचा समावेश होता. एक महिन्यापूर्वीच अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मा कुलगुरू डॉ रविप्रकाश दाणी यांनी विद्यापीठास भेट दिली होती, विद्यापीठातील विविध उपक्रम पाहून प्रभावीत होऊन यांनी हि भेट आयोचीत केली होती.

मा कुलगुरू पुढे म्हणाले की विविध विद्यापीठातील नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास प्रत्यक्ष भेट देऊन  विद्यापीठातील शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यामध्ये  विचारांची देवाण - घेवाण होऊन कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यास दिशा प्राप्त होईल, या प्रकारच्या भेटी सातत्याने व्हावीत. 

अकोला येथील कृषी विद्यापीठचे संशोधन संचालक डॉ एस वि सरोदे म्हणाले की, मराठवाडा कृषी विद्यापीठाने देशाला अनेक कुलगुरू दिले आहेत. कुलगुरू मा. डॉ गोरे हे नेहमी राज्यस्तरीय बैठकीत कृषी विद्यापीठाच्या विकासाच्या मुद्यावर आग्रही असतात. जास्तीतजास्त निधी प्राप्त होण्यासाठी व त्याच्या योग्य नियोचनासाठी प्रयत्नशील असतात. याभेटीत अनेक नवीन उपक्रमाच्या माहितीचा आम्हास निश्चितच लाभ होईल.
याप्रसंगी कृषी विद्यापीठातील सिंचन स्रोत विकास प्रकल्प, सौर उर्जा पार्क, लिम्बुवर्गीय तंत्रज्ञान अभियान येधील रोपवाटिका, ऊस लागवड प्रक्षेत्र, पशु संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग येथील शेळी पालन व दुग्ध प्रक्रिया प्रयोगशाळा, मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र  प्रयोगशाळा, अन्नतंत्र प्रक्रिया प्रयोगशाळा, ऊती संवर्धन प्रयोगशाळा गृहविज्ञान महाविदयालय आदी नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास भेट दिली. 

यावेळी विद्यापीठाचे  शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ विश्वास शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागीरे, विद्यापीठ अभियंता श्री डी डी कोळेकर आदी उपस्थित होते.  

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ एन डी पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य प्रा विशाला पट्टणम, अन्नतंत्र   महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ पी एस कदम,  कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ अशोक कडाळे तसेच विभाग प्रमुखांनी व प्राध्यापकानी या विविध उपक्रमाची माहिती दिली. 
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे मार्गदर्शन केले
कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या सौर ऊर्जा पार्कास  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी माहिती देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, डॉ अशोक कडाळे, प्रा डी डी टेकाळे  आदी. 
कृषी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या  आधुनिक औचाराची माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना प्रा पी ए मुंढे. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, डॉ अशोक कडाळे  आदी. 
ऊती संवर्धन प्रयोगशाळेची माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना प्रा आनंद दौंडे . यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आदी. 
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमास डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरू मा डॉ किशनराव गोरे मार्गदर्शन केले
 लिम्बुवर्गीय तंत्रज्ञान अभियान येधील रोपवाटिकाची  माहिती  डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना डॉ एम बी सरकटे. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रा बोराडे, डॉ एन डी देशमुख आदी.
कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राच्या नाविन्यपूर्ण विविध विस्तार उपक्रमा बाबत डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्यानी दि २४.०१.२०१३ रोजी भेट दिली. यावेळी माहिती देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण व प्रा आनंद गोरे आदी. 
ऊस प्रक्षेत्राबाबत माहिती डॉ बी व्ही आसेवर व डॉ उदय खोडके डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील उच्चस्तरिय अधिकाऱ्याना देतांना . यावेळी देतांना विस्तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, प्रा पी के वाघमारे आदी. 

Thursday, January 24, 2013

मा डॉ किशनराव गोरे यांचा मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या कुलगुरूपदी दोन वर्ष कार्यकाल पूर्ण


त्यानिमित्य सर्व विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हार्दिक शुभेच्छा   

मा कुलगुरू यांचे तंत्र अधिकारी  डॉ के व्ही देशमुख  यांचा मा कुलगुरू यांच्या कार्यबाबत लेख