वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयात शिवजयंती महोत्सवानिमित्त सांस्कृतिक स्पर्धांचे दिमाखदार आयोजन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, लातूर येथे
प्रतिवर्षी साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव यंदाही अत्यंत
उत्साहाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवानिमित्त दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी
आयोजित सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्ष म्हणून
लाभले.
या कार्यक्रमास
प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी
दिल्ली अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान
विषयाचे सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार
सिंह, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्यासह डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ.
अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, डॉ.
मोहन धुप्पे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ.
ज्योती देशमुख, डॉ. अशोक घोटमोकळे व डॉ. विजय भामरे हे
मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची
सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
शिवरायांच्या विचारांचा वारसा लाभलेली ही भूमी पवित्र असल्याचे सांगितले. मोजक्याच
साधनांमध्ये स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांनी संधींचा योग्य वापर करून
नवनवीन संधी निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांसमोर विविध
क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध असून, कृषि महाविद्यालय लातूरचा
परिसर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत पोषक आहे, अशी शाबासकीची थाप देत त्यांनी विद्यार्थ्यांनी योग्य शिक्षणासोबत शिवरायांचा
आदर्श घेऊन कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन
केले.
प्रमुख अतिथी डॉ.
भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासात सांस्कृतिक
स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करत शैक्षणिक अभ्यासासोबत सांस्कृतिक कलागुणांना वाव
देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. यानंतर बहारदार गायन, शास्त्रीय
व पाश्चात्य नृत्य तसेच भारतातील विविध प्रदेशांच्या लोकनृत्य सादरीकरणाने
उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या
विद्यार्थ्यांना चषक, पदके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात
आले. यावेळी शासकीय व बँक सेवेत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये पुरस्कारप्राप्त गुणवंत विद्यार्थी सुहास
सोन्ने, कृष्णा गायकवाड, तुषार साळवे,
शुभम गटकल, आशिष बिराजदार यांचा तसेच
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परीसंवादांमध्ये पुरस्कारप्राप्त सिद्धी देसाई, प्रतीक्षा खेडकर, सुशांत बिराजदार, कृष्णा देशमुख, मयूर मोरे, गौरव
पाटील, नागेश वाघ, यांचा विशेष सत्कार
करण्यात आला.
सूत्रसंचालन निर्भय
त्रिपाठी व वेदश्री पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजय भामरे यांनी मानले.
महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने हा सांस्कृतिक
महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.
.jpeg)


