वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत
कार्यरत सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रास दिनांक १२
फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत संचालक संशोधन डॉ. खिजर बेग
यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी
माननीय कुलगुरू महोदयांनी केंद्रातील नैसर्गिक शेती पद्धतीखाली घेतलेल्या भाजीपाला
पिकांच्या संशोधन प्रात्यक्षिकांची,
तसेच नैसर्गिक निविष्ठा (इनपुट) निर्मिती संचाची सखोल पाहणी केली.
त्यांनी केंद्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत शेवगा, ड्रॅगन फ्रूट व कढीपत्ता यांची लागवड करण्याबाबत, तसेच
उपलब्ध असलेली जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणून हंगामी पिके व आच्छादन पिके (Cover
Crops) घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. निविष्ठा निर्मितीसाठी
विशेषतः नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र व विशेष निविष्ठा निर्मिती कक्ष स्थापन
करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच डाळी व भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक
वाणांचे (लँडरेसेस) संवर्धन, संकलन व मूल्यांकन यावर संशोधन
हाती घेण्याच्या सूचनाही माननीय कुलगुरू यांनी दिल्या.
यावेळी संचालक
संशोधन डॉ. खिजर बेग यांनी भाजीपाला पिकांच्या देशी व स्थानिक वाणांचे मूल्यांकन, तसेच देशी व संकरित गोवंश जातींच्या
कार्यक्षमतेचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच केंद्रामध्ये मेक्सिकन
(झायगोग्राम्मा) भुंगे (Zygogramma Beetle) संगोपन, गांडूळ खत (वर्मी-कंपोस्ट) निर्मिती व ट्रायकोडर्मा उत्पादनाचे व्यावसायिक
कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले.
या
भेटीदरम्यान माननीय अधिकाऱ्यांनी सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन अधिक प्रभावी व
शेतकरीकेंद्रित करण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

