हवामान-अनुकूल संवेदनशील शेतीत
आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी काठमांडू (नेपाळ) येथे दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२६ रोजी “कृषि अभियांत्रिकी आणि हवामान-अनुकूल शेती (Agricultural Engineering and Climate-Smart Agriculture)” या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद–२०२६ मध्ये प्रमुख व्याख्यान दिले.
ही आंतरराष्ट्रीय
परिषद नेपाळी सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स (NSAE), नेपाळ
यांच्या वतीने iDE
(International Development Enterprises)
यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली
होती. परिषदेत आशियाई देशांतील नामवंत शास्त्रज्ञ,
अभ्यासक,
संशोधक,
शिक्षणतज्ज्ञ तसेच उद्योग क्षेत्रातील
प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी “शाश्वत
अन्नसुरक्षेसाठी हवामान-अनुकूल शेती (Climate-Resilient
Agriculture for Food Security)”
या विषयावर मार्गदर्शन करताना हवामान
बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी हवामान-अनुकूल तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण
तसेच धोरणाधिष्ठित नवकल्पनांची भूमिका अधोरेखित केली. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू
व अर्धकोरडवाहू प्रदेशासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हवामान-अनुकूल पीक वाणांचा विकास, कृषि यंत्रसामग्री
तसेच शाश्वत शेती पद्धती विकसित करण्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण
तसेच क्षमता वृद्धी (Capacity Building) यांचे महत्त्व विशद करत हवामान-स्मार्ट शेतीला चालना
देण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. हे सर्व उपक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले.
माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी प्रमुख व्याख्यानास आंतरराष्ट्रीय स्तरावरील
मान्यवरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या परिषदेत
आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त दहा तज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, आफ्रो-एशियन असोसिएशन
ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स (AAAE) चे महासचिव डॉ. सय्यद इस्माईल,
नेपाळ येथील iDE चे संचालक डॉ.
मेनिला खरल तसेच नेपाळच्या राष्ट्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. लक्ष्मी
प्रसाद देवकोटा यांचा समावेश होता.
व्याख्यात्यांनी
कृषी अभियांत्रिकीतील नवकल्पना हवामान बदलाशी सुसंगत करण्याची, धोरणात्मक पाठबळ
मजबूत करण्याची तसेच शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याची तातडीची गरज
अधोरेखित केली. परिषदेत हवामान-स्मार्ट शेती व पशुपालन, कृषी यांत्रिकीकरण व
स्वयंचलन, काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न अभियांत्रिकी, जलसंधारण व मृदा
अभियांत्रिकी, ग्रामीण व नवीकरणीय ऊर्जा,
डिजिटल सल्ला सेवा (DAS), आधुनिक
तंत्रज्ञान तसेच स्मार्ट ग्रामीण पायाभूत सुविधा या महत्त्वपूर्ण विषयांवर
तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेती विकासासाठी कृषि अभियांत्रिकीचे योगदान अधोरेखित करणे, संशोधन व नवतंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. या सहभागामुळे भारत–नेपाळ दरम्यान कृषि अभियांत्रिकी व हवामान-संवेदनशील शेती क्षेत्रातील शैक्षणिक व संशोधन सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani delivers
keynote address at an International Conference in Nepal
Highlights the need for international cooperation in
climate-resilient and climate-sensitive agriculture
Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, delivered a keynote address at the International Conference 2026 on the theme ‘Agricultural Engineering and Climate-Smart Agriculture,’ held in Kathmandu (Nepal) on 5th and 6th February 2026.
This international conference was organized by the Nepalese Society of Agricultural Engineers (NSAE), Nepal, in collaboration with iDE (International Development Enterprises). Renowned scientists, academicians, researchers, education experts, as well as representatives from the industry sector from various Asian countries participated in the conference in large numbers.
Hon’ble
Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani, while guiding on the topic “Climate-Resilient Agriculture for Food Security,”
highlighted the role of climate-resilient technologies, agricultural
mechanization, and policy-driven innovations in addressing the challenges
arising from climate change. He stated that Vasantrao Naik Marathwada Agricultural University has
made significant contributions to the development of climate-resilient crop
varieties, agricultural machinery, and sustainable farming practices, which are
especially beneficial for dryland and semi-arid regions like Marathwada.
On this
occasion, he elaborated on the importance of international collaboration, technology transfer, and capacity building,
and emphasized the need for collective
efforts to promote climate-smart agriculture. He also clarified
that all these initiatives are in
alignment with the objectives of the National Education Policy (NEP) 2020.
The effective
keynote address delivered by Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani
received an overwhelming response from eminent dignitaries at the international
level. The event featured ten internationally
recognized experts, including Prof. Dr. Indra Mani, Vice Chancellor of VNMKV, Dr.
Syed Ismall, General Secretary of the Afro-Asian Association of Agricultural
Engineers (AAAE); Dr. Menila Kharal, Nepal Country Director of iDE; and Dr.
Laxmi Prasad Devkota, former member of Nepal’s National Planning Commission.
Speakers emphasized the urgency of aligning engineering innovation with climate
adaptation, policy support, and farmer-centric approaches.
The conference
featured technical sessions on several important themes, including
climate-smart agriculture and livestock management, agricultural mechanization
and automation, post-harvest technology and food engineering, water
conservation and soil engineering, rural and renewable energy, digital advisory
services (DAS) and modern technologies, as well as smart rural infrastructure.
The main
objective of the conference was to highlight the contribution of agricultural
engineering toward sustainable agricultural development in the context of
climate change, promote research and innovative technologies, and strengthen
international collaboration. It was expressed that this participation would
help further reinforce academic and research cooperation between India and
Nepal in the fields of agricultural engineering and climate-resilient
agriculture.

.jpeg)
.jpeg)