माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने उत्कृष्ट संशोधनास तीन राज्यस्तरीय पारितोषिके
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील
मृदविज्ञान विभागाने अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मृदविज्ञान
परिसंवादात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने मृदविज्ञान विभागातील ७
शास्त्रज्ञ व १५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सक्रिय सहभाग नोंदविला.
या परिसंवादात विद्यापीठातील मृदविज्ञान विभागाच्या आचार्य (पीएच.डी.) पदवीच्या
विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांपैकी निकिता परदेशी,
प्रियांका नखाते व ओमकार भोसले यांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधन
सादरीकरणासाठी राज्यस्तरीय पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कृषि
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य हे ओमकार भोसले यांचे
मार्गदर्शक असून, डॉ. सुरेश वाईकर यांनी
प्रियांका नखाते यांना तसेच डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी निकिता परदेशी यांना
संशोधनासाठी मार्गदर्शन केले. तसेच पदव्युत्तर पदवीदरम्यान संशोधनात सहभागी
असलेल्या इतर मार्गदर्शक शास्त्रज्ञांचेही विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले.
या यशामध्ये
डॉ. प्रविण वैद्य यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन,
परिसंवादात प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेले प्रोत्साहन तसेच
मृदविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांचा सततचा पाठपुरावा यांचा विशेष
वाटा आहे. याशिवाय दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रमुख डॉ. रामप्रसाद खंदारे
यांनी सादरीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट
सादरीकरण करणे शक्य झाले.
या
राज्यस्तरीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांमधील मृदविज्ञान विषयाचे
आचार्य व पदव्युत्तर स्तरावरील सुमारे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामधून
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी येथील तीन विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी
निवड होणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय
यशाबद्दल राज्यातील मृदविज्ञान परिवारातर्फे,
तसेच कृषि विद्यापीठाच्या विविध स्तरांतून, परभणी
चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्सच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून या
विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शकांचे व मृदविज्ञान
विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

.jpeg)
