वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १६
फेब्रुवारी २०२६ रोजी सिरसाळा (ता. परळी, जि. बीड) येथील
ग्लोबल विकास ट्रस्टला भेट दिली. यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी
यांनी त्यांचे स्वागत केले.
ग्लोबल विकास
ट्रस्टच्या माध्यमातून परळी तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक कृषी विषयक उपक्रम
राबविण्यात येत असून,
त्यांना विद्यापीठाकडून तांत्रिक पाठबळ पुरविण्यात येत आहे. तसेच
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्यात यापूर्वी
सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
या भेटीदरम्यान
भविष्यात संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
फळबाग लागवड वाढविणे,
रेशीम उद्योगास चालना देणे तसेच शेतीतील वैविध्यता जपण्यासाठी
संयुक्त प्रयत्न करण्यावर मान्यवरांमध्ये एकमत झाले. या सहकार्यामुळे शेतकऱ्यांचे
उत्पन्न वाढीस लागून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Hon’ble Vice-Chancellor of Vasantrao
Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Prof. (Dr.) Indra Mani, visited Global Development Trust.
The Hon’ble Vice
Chancellor of Vasantrao Naik
Marathwada Agricultural University, Parbhani, Prof. (Dr.) Indra Mani, visited the Global Development Trust at Sirsaala
(Taluka Parli, District Beed) on 16 February 2026. On this occasion, the
Trust’s Founder President, Mayank
Gandhi, welcomed him.
Through the
Global Development Trust, several agriculture-related initiatives are being
implemented in various villages of Parli taluka, for which technical support is
being provided by the University. A Memorandum of Understanding has already
been signed earlier between Vasantrao Naik Marathwada Agricultural University
and the Global Development Trust.
During the
visit, detailed discussions were held on undertaking joint initiatives in the
future. The dignitaries reached a consensus on working together to promote
orchard development, boost sericulture, and preserve diversification in
agriculture. It was expressed that this collaboration would help increase
farmers’ income and accelerate sustainable development in rural areas.
