माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ मान्यता प्राप्त, श्री आनंदी आत्मानंद सरस्वती
उर्फ रंगनाथ महाराज संस्थान, नाव्हा (ता. व जि. जालना)
संचलित श्री रंगनाथ महाराज कृषि महाविद्यालय येथील
विद्यार्थ्यांनी मध्यांचल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, भोपाळ
(मध्य प्रदेश) येथे दिनांक २२ ते २७ फेब्रुवारी
२०२६ दरम्यान आयोजित अखिल भारतीय वुडबॉल
स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय
यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी खेळाडूंचे
अभिनंदन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मणराव कुलकर्णी
आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन
करून शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत
देशभरातील 110
विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यामधून
महाविद्यालयाचे विद्यार्थी सचिन घोडके व ओम करवंदे
यांनी उत्कृष्ट खेळ सादर करत सुवर्णपदक मिळवले. तसेच महाविद्यालयाच्या संघाने—श्रीधन वाघ, ऋषिकेश
क्षीरसागर, रितेश चंद, सिताराम वाघ,
सोमनाथ चाटे आणि नागेश घुबे—यांच्या
समन्वयपूर्ण खेळाच्या जोरावर भारतात चौथा क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक श्री वाघ
यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेतर्फे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक व त्यांच्या सर्व
सहकाऱ्यांचे तसेच सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

.jpeg)