Monday, February 9, 2026

भारत@१०० साठी शाश्वत कृषि व आरोग्य विकासात कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्णायक भूमिका : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद २०२६; कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानावर भर


अचूक शेती (Precision Agriculture), स्मार्ट कृषि व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारित निर्णयप्रक्रिया तसेच हवामान-अनुकूल परिस्थितीत उत्पादनवाढ, खर्चकपात आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील प्रगती विषयावरील परिषद २०२६ (The International Conference on Advances in Information Technology and Management – ICAIM 2026) मध्ये मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च (TIMSCDR) यांच्या वतीने करण्यात आले होते. “कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वततेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर – भारत@१०० साठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ही परिषद दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतील ठाकूर एज्युकेशनल कॅम्पस, कांदिवली (पूर्व) येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवोन्मेषाधारित शाश्वत कृषि विकास” या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले. हवामान बदल, संसाधनांची टंचाई आणि वाढत्या अन्नसुरक्षेची आव्हाने यांना सामोरे जाताना कृषि क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान संशोधक, विद्यार्थी, शेतकरी तसेच धोरणकर्त्यांसाठी दिशादर्शक ठरले.

या कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT), मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. सुजीत कुमार शुक्ला हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. परिषदेत AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience या विषयावर अमेरिकेतील कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथील डिजिटल अ‍ॅग्रोनॉमी रिसर्च टीम (DART) चे संचालक डॉ. गौरव झा यांनी मार्गदर्शन केले. तसेच AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture  या विषयावर पालघर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व कृषि तज्ज्ञ डॉ. अमोल व्ही. दहिफळे यांनी शाश्वत शेतीसाठी AI आधारित प्रणालींचे महत्त्व विशद केले. AI Enabled Digital Ecosystem for Climate Resilient Agriculture या विषयावर महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातील कृषि व मृदाशास्त्र तज्ज्ञ श्री. विजय कोळेकर यांनी हवामान-सहनशील शेतीसाठी डिजिटल परिसंस्थेची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या शेवटी “AI for Bharat@100: भारतीय कृषितील प्रश्न व आव्हाने” या विषयावर तज्ज्ञांची सखोल पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेमध्ये AI तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीतील संधी, अडचणी तसेच भविष्यातील दिशा यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), स्वयंचलन (Automation) आणि डिजिटल परिसंस्था यांचा कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कसा प्रभावी वापर करता येईल, यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली. उत्पादनक्षमता वाढ, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन, सेवा सुलभता, ताणतणावांना सामोरे जाण्याची क्षमता (Resilience) आणि दीर्घकालीन शाश्वतता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

कृषि व आरोग्य क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी जबाबदार आणि विस्तारयोग्य (Scalable) AI उपाययोजनांना चालना देण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक संस्था, उद्योग, शासन आणि संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत@१०० साठी तंत्रज्ञानाधारित, सक्षम आणि शाश्वत भवितव्य घडविण्यात ICAIM 2026 महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.





 

The Decisive Role of Artificial Intelligence in Sustainable Agricultural and Healthcare Development for India@100: Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani

 

International Conference on Advances in Information Technology and Management 2026 held in Mumbai; emphasis on Artificial Intelligence and Information Technology for sustainability in the agriculture and healthcare sectors.

 

Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani emphasized that modern technology plays a crucial role in promoting Precision Agriculture, smart agricultural management, and technology-driven decision-making, as well as in increasing productivity, reducing costs, and enhancing farmers’ income under climate-resilient conditions. He was speaking as the Chief Guest at the International Conference on Advances in Information Technology and Management (ICAIM 2026), organized to discuss recent developments in the fields of information technology and management.

The international conference was organized by Thakur Institute of Management Studies, Career Development and Research (TIMSCDR), Mumbai. The conference, based on the central theme “Leveraging Information Technology for Sustainability in Agriculture and Healthcare – Artificial Intelligence (AI) for Bharat@100,” was successfully held on 7 February 2026 at the Thakur Educational Campus, Kandivali (East), Mumbai.

On this occasion, Hon’ble Vice Chancellor Prof. (Dr.) Indra Mani delivered in-depth guidance on the highly significant topic “Innovation-driven Sustainable Agricultural Development through Drone Technology, Digital Tools, and Artificial Intelligence.” He emphasized that AI-based digital solutions are becoming extremely important for the agricultural sector in addressing challenges such as climate change, resource scarcity, and growing food security concerns. His scholarly and inspiring lecture proved to be a guiding force for researchers, students, farmers, and policymakers alike.

The programme was graced by the presence of Dr. Sujit Kumar Shukla, Scientist at the Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT), Mumbai, under the Indian Council of Agricultural Research (ICAR), as the Guest of Honour.

During the conference, Dr. Gaurav Jha, Director of the Digital Agronomy Research Team (DART) at Kansas State University, USA, delivered an expert lecture on the theme “AI-Assisted Digital Solutions for Agricultural Resilience.”

Dr. Amol V. Dahiphale, Officer-in-Charge and Agricultural Expert at the Agricultural Research Centre, Palghar, elaborated on the importance of AI-based systems for sustainable agriculture while speaking on “AI for Smart Agronomy and Sustainable Agriculture.”

On the theme “AI-Enabled Digital Ecosystem for Climate-Resilient Agriculture,” Mr. Vijay Kolekar, Agriculture and Soil Science Expert from the Department of Agriculture, Government of Maharashtra, emphasized the need for a robust digital ecosystem to support climate-resilient farming practices.

At the conclusion of the programme, an in-depth expert panel discussion was organized on the topic “AI for Bharat@100: Issues and Challenges in Indian Agriculture.” The discussion focused on the opportunities, challenges, and future directions related to the implementation of AI technologies in the agricultural sector.

As India moves towards the centenary of its independence, the conference witnessed comprehensive deliberations on the effective use of Artificial Intelligence, Data Analytics, Internet of Things (IoT), Automation, and digital ecosystems for sustainable development in the agriculture and healthcare sectors. Special emphasis was laid on increasing productivity, efficient resource management, ease of service delivery, resilience to stresses, and long-term sustainability.

The conference was organized with the objective of promoting responsible and scalable AI solutions for sustainable development in agriculture and healthcare. The organizers expressed confidence that ICAIM 2026 will play a significant role in shaping a technology-driven, empowered, and sustainable future for Bharat@100 by strengthening collaboration among academic institutions, industry, government, and the research community.