Monday, February 16, 2026

वनामकृवित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ निमित्त भव्य आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंतीचे सुवर्ण जयंती दिक्षांत सभागृहात दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले असुन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  हे राहणार. त्यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येणार असुन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दुपारी ४.०० वाजता शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठातील विद्यार्थीप्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी असे आवाहन विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले आहे.