कृषि विकास प्रतिष्ठानचे माननीय चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांनी केले स्वागत
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कृषि
विज्ञान केंद्र, बारामती येथे भेट दिली. या प्रसंगी कृषि
विकास प्रतिष्ठान, बारामती चे माननीय चेअरमन श्री. राजेंद्र
पवार यांनी माननीय कुलगुरूंचे स्वागत केले. माननीय कुलगुरूंसमवेत कृषी व शेतकरी
कल्याण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे तांत्रिक
सल्लागार डॉ. ए. के. मिश्रा उपस्थित होते. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख
समन्वयक डॉ. डी. ए. शिंदे, संचालक श्री. निलेश नलावडे,
विषय विशेषज्ञ प्रा. एस. व्ही. करंजे तसेच अन्य मान्यवर उपस्थित
होते.
या
भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येत
असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नाविन्यपूर्ण प्रयोगांमुळे
शेतकऱ्यांना मिळालेल्या वाढीव उत्पादनाबाबत केंद्रातील शास्त्रज्ञांनी माहिती
दिली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे विकसित तुरीच्या ‘गोदावरी’
वाणावर करण्यात आलेल्या AI आधारित प्रयोगांत उत्कृष्ट
उत्पादन मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच AI आधारित
ऊस व मका पिकांवरील प्रयोगांची माहितीही माननीय कुलगुरूंना देण्यात आली.
याशिवाय कृषि
विज्ञान केंद्रामार्फत चालविण्यात येणाऱ्या रोपवाटिका, गोवंश संवर्धन व गुणवत्ता वृद्धी यांसारख्या
उपक्रमांची माननीय कुलगुरूंनी पाहणी केली. या भेटीदरम्यान शेतकरी सेवेसाठी परस्पर
सहकार्य, विद्यापीठीय तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम
तसेच विविध सहकार्यात्मक उपक्रम राबविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
दरम्यान
तांत्रिक सल्लागार डॉ. ए. के. मिश्रा यांनी पावसावर अवलंबून (रेनफेड)
क्षेत्रांच्या विकासासाठी राष्ट्रीय पावसावर आधारित क्षेत्र प्राधिकरण (NRAA) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध
कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
या सहकार्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचून उत्पादनक्षमता व उत्पन्नवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Visit of
Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani to Krishi Vigyan Kendra,
Baramati; Emphasis on Mutual Collaboration for Farmers’ Welfare
Warm welcome extended by Hon’ble Chairman of Krushi Vikas
Pratisthan, Shri Rajendra Pawar
Hon’ble Vice Chancellor of Vasantrao
Naik Marathwada Agricultural University, Prof. (Dr.) Indra Mani, visited the Krushi
Vigyan Kendra, Baramati on 17 February 2026. On this occasion, Hon’ble Chairman
of Agriculture Development Trust, Baramati, Shri Rajendra Pawar, extended a
warm welcome to the Hon’ble Vice Chancellor.
Dr. A. K. Mishra, Technical Advisor
to the National Rainfed Area Authority under the Ministry of Agriculture and
Farmers Welfare, was present along with the Hon’ble Vice Chancellor. Also
present were Dr. D. A. Shinde, Senior Scientist and Head of the Krushi Vigyan
Kendra, Shri Nilesh Nalawade, Director, Subject Matter Specialist Prof. S. V.
Karanje, and other dignitaries.
During the visit, the Hon’ble Vice
Chancellor reviewed in detail various activities being implemented through the
Krushi Vigyan Kendra. Scientists of the center shared information on the
increased crop productivity achieved by farmers through innovative experiments
based on Artificial Intelligence (AI). It was highlighted that AI-based
experiments conducted on the ‘Godavari’ pigeon pea variety developed by
Vasantrao Naik Marathwada Agricultural University have resulted in excellent
yields. Information was also shared on AI-based experimental work on sugarcane
and maize crops.
In addition, the Hon’ble Vice
Chancellor inspected various initiatives undertaken by the Krushi Vigyan
Kendra, including nurseries, cattle breeding, and genetic quality improvement
programs. Detailed discussions were held on mutual cooperation for farmer
services, dissemination of university technologies, training programs, joint
certificate courses, and the implementation of collaborative initiatives.
Meanwhile, Technical Advisor Dr. A.
K. Mishra provided comprehensive information on various programs being
implemented under the National Rainfed Area Authority (NRAA) for the
development of rainfed regions.
It was expressed with confidence
that this collaboration will effectively deliver modern technologies to farmers,
thereby significantly enhancing productivity and farmers’ income.



.jpeg)



.jpeg)
