Sunday, February 15, 2026

परळी वैद्यनाथ येथे वनामकृविच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विशेष प्रार्थना

 

भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथ (जि. बीड) ज्योतिर्लिंग येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विशेष महादेव दर्शन व प्रार्थना करण्यात आली.

यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय वनस्पती जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्राचे जैवतंत्रज्ञान विषयातील सेवानिवृत्त ख्यातनाम राष्ट्रीय प्राध्यापक प्रा. (डॉ.) नागेंद्र कुमार सिंह, तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महादेवाकडे मनोभावे प्रार्थना केली.

या प्रार्थनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कल्याण, विद्यापीठातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तसेच विद्यापीठाच्या सर्वांगीण विकास व समृद्धीसाठी ईश्वरचरणी साकडे घालण्यात आले. याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड आणि डॉ. दिनेशसिंह चौव्हाण यांची उपस्थिती होती.

परळी वैद्यनाथ येथे केलेली ही प्रार्थना विद्यापीठाच्या समाजाभिमुख दृष्टीकोनाचे प्रतीक असून, शेतकरी-केंद्रित संशोधन, शिक्षण व विस्तारकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.